100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर्स करणार मालामाल; 36% वाढीचा तज्ज्ञांना विश्वास | Gateway Distriparks Limited Stock | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share market

100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर्स करणार मालामाल; 36% वाढीचा तज्ज्ञांना विश्वास

Best Stock to Buy: लॉजिस्टिक क्षेत्रातील कंपनी गेटवे डिस्ट्रीपार्क्स लिमिटेडचे (Gateway Distriparks Limited) मार्च 2022 तिमाहीचे निकाल अत्यंत चांगले आले आहेत. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात आणि EBIDTA मध्ये देखील वाढ झाली आहे. रेल्वे व्यवसायात कंपनीची व्हॉल्यूम वाढ खूप मजबूत आहे. निकालानंतर हा स्टॉक ब्रोकरेज हाऊसच्या रडारवर आला आहे. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीज, शेअरखान, निर्मल बंग इक्विटी रिसर्च यांनी गेटवे डिस्ट्रीपार्क्स लिमिटेडचे (Gateway Distriparks Limited) शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने स्टॉकवरील टारगेटही अपडेट केले आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजार तेजीसह सुरु; सेन्सेक्स 296 तर निफ्टी अंकांनी वधारला

गेटवे डिस्ट्रिपार्क्स लिमिटेडने (GDL) मार्च 2022 च्या तिमाहीत नेट प्रॉफिट 84.40 टक्क्यांनी वाढून 85.53 कोटी रुपये झाले आहे. FY21 च्या मार्च तिमाहीत कंपनीला 46.38 कोटींचा नफा झाला होता. कंपनीचे एकूण उत्पन्न 6.80 टक्क्यांनी वाढून 377.04 कोटी रुपये झाले आहे. Q4FY21 मध्ये उत्पन्न 353.11 कोटी रुपये होते. EBIDTA वर्षभराच्या आधारावर 15 टक्क्यांनी वाढून 112.88 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मार्च 2021 च्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 98.14 कोटी रुपये होता.

ब्रोकरेज काय म्हणतात?

निर्मल बंग सिक्युरिटीजनेही शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअरचे टारगेट 88 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आले आहे.कंपनीचा नफा 4QFY22 मध्ये मजबूत झाला आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या (DFC) पॉर्शियल लाँचमुळे कंपनीला फायदा झाला आहे. वार्षिक आधारावर रेल्वेच्या व्हॉल्यूममध्ये 16 टक्के वाढ झाली आहे. मजबूत कॅश फ्लोमुळे, कंपनीचे नेट डेट टू इक्विटी रेश्‍यो 3QFY22 मध्ये 0.24 टक्क्यांवरून 4QFY22 मध्ये 0.18 टक्क्यांवर आले आहे.

हेही वाचा: महिंद्रा अँड महिंद्राचे (M&M) शेअर्स करणार मालामाल; 72 टक्के वाढीचा तज्ञांचा अंदाज

ICICI सिक्युरिटीजने गेटवे डिस्ट्रीपार्क्स लिमिटेडचे (Gateway Distriparks Limited)आपले खरेदीचे मत कायम ठेवले आहे. तसेच, प्रति शेअर टारगेट 83 रुपयांवरून 102 रुपये करण्यात आले आहे. ब्रोकरेजचा विश्वास आहे की कंपनीच्या इंडस्ट्री रेल कंटेनर व्हॉल्यूममध्ये ग्रोथ (Q4FY22 साठी 16% YoY वाढ; FY22 साठी 34% YoY वाढ). सुरू आहे. कंपनीचा मार्केट शेअर मजबूत आहे. ICICI सिक्युरिटीजने सर्वात जास्त टारगेट दिले आहे. 28 एप्रिल रोजी शेअरची किंमत 75 रुपयांच्या आसपास होती. म्हणजेच गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपासून सुमारे 36 टक्के इतका मजबूत परतावा मिळू शकतो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Share Market A Logistics Company Gateway Distriparks Limited Best Stock To Buy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top