esakal | 'अदानी'च्या शेअर होल्डर्ससाठी 'काळा सोमवार'; सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले; जाणून घ्या कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market-Down

'अदानी'च्या शेअर होल्डर्ससाठी 'काळा सोमवार'; सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले

sakal_logo
By
सुमित बागुल

अदानी ग्रुप ऑफ कंपनीजच्या शेअरहोल्डरसाठी आजचा दिवस काळा दिवस म्हणून उगवला. कारण अदानी ग्रुप ऑफ कंपनीच्या सहा लिस्टेड कंपन्यांपैकी साही कंपन्यांचे शेअर्स आज मजबूत कोसळून थेट लोअर सर्किटला लागलेले पाहायला मिळाले. याला कारण ठरलंय ते म्हणजे (NDSL) नॅशनल डिपॉझिटरी सिक्युरिटी लिमिटेडने केलेली मोठी कारवाई.

NDSL ने अदानी ग्रुप ऑफ कंपनीजच्या महत्त्वाच्या तीन परदेशी गुंतवणूकदार फंड्सवर कारवाई केली आहे. NDSL ने या तीनही फंड्सचे ट्रेडिंग अकाउंट्स गोठवले आहेत. ज्यामुळे आज अदानी गृप ऑफ कंपनीच्या शेअर्सवर मोठा भूकंप आल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा: 'आणखी एक घोटाळा', सुचेता दलाल यांचे ट्विट आणि शेअर बाजारात घसरण

दुपारी १.३० वाजेपर्यंत किती पकोसळलेत अदानीचे शेअर्स

१. अदानी एंटरप्राइज (Adani Enterprises) या कंपनीचे शेअर्स तब्बल ११.१५ टक्क्यांनी कोसळून १४२५ ते १४३० प्रति शेअरच्या घरात ट्रेड करत होते

२. अदानी पोर्ट्स (Adani Ports) या कंपनीचे शेअर्स ११.८२ टक्के कोसळून प्रति शेअर ७३५ ते ७४० घ्या घरात ट्रेड करत होते.

३. अदानी ग्रीन्स (Adani Greens) या कंपनीचे शेअर्स ५ टक्के कोसळून ११५६.९० रुपये प्रति शेअर वर आले होते.

४. अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) या कंपनीचा शेअर देखील ५ टक्के कोसळून १५२२.५० रुपये प्रति शेअरवर आलेला पाहायला मिळाला

५. अदानी पॉवर (Adaani Power) या कंपनीत देखील कमालीची मंदी पाहायला मिळाली. कंपनीचा शेअर कोसळून १४०.९० रुपयांवर आला.

६. अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) या कंपनीचा शेअर देखील ५ टक्के कोसळून १५४४ .९० रुपयांवर आलेला होता.

हेही वाचा: अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेल्या 3 FPI वर कारवाई ; शेअर्स कोसळले

7 जून २०२१ रोजी अदानी इंटरप्राइझेस या कंपनीने आतापर्यंतच्या १७१७.१२ या उच्चांकी किमतीला गवसणी घातली होती. त्यानंतर शेअर सलग कोसळताना पाहायला मिळाला. आज अदानी इंटरप्राइझेसचा शेअर कोसळून थेट १२०१ रुपयांपर्यंत खाली आलेला पाहायला मिळाला. म्हणजेच शेअरमध्ये तब्बल ४०० ते ५०० रुपयांची मंदी झालेली पाहायला मिळाली.

BSE वर कंपनीची मार्केट कॅप १.४ लाख करोड रुपयांनी घटली

अदानी इंटरप्राइझेस ही अदानी ग्रुप ऑफ कंपनीज पैकी सर्वात महत्त्वाची कंपनी आहे. यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर म्हणजेच BSE वर कंपनीची मार्केट कॅप १.४ लाख करोड रुपयांनी घटल्याचे नोंदवलं गेलं आहे. या शेअरच्या किमती गेल्या वर्षात तब्बल ७०० टक्के वधारलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. तर या वर्षाच्या सुरवातीपासून या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तब्बल २०० टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळाली होती.

हेही वाचा: 'या' शेअर्समुळं तुम्ही होऊ शकता मालामाल! जाणून घ्या सविस्तर

का कोसळल्या शेअर्सच्या किमती

NDSL ने केलेल्या कारवाईत जी अकाउंट्स गोठवली गेली आहेत त्यांच्याकडे अदानी ग्रुप ऑफ कंपनीजचे तब्बल ४३ हजार ५०० शेअर्स आहेत. यामध्ये अदानी इंटरप्राइझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांचा समावेश आहे. अलबुला इन्व्हेस्टमेंट फंडस्, क्रेस्ट फंड्स आणि APMS इन्व्हेस्टमेंट फंडस् या तिघांची खाती NSDL ने गोठवली असून त्याबाबतची माहिती NSDL च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. खाती गोठवली म्हणजेच आता या कंपंनीचे कोणतेही शेअर्स हे तीनही फंडस् हाऊसेस विकत घेऊ शकत नाही किंवा विकूही शकत नाहीत.

loading image
go to top