
Share Market: शेअर बाजारात तेजी; आज हे 10 शेअर्स दाखवतील चमक
शुक्रवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. कच्च्या तेल आणि वायूच्या किमतीत घट झाल्याने बाजारात तेजी दिसून आली. बाजाराला आयटी आणि मेटल शेअर्सचा मोठा सपोर्ट मिळाला. शेवटी, सेन्सेक्स 436.94 अंकांच्या अर्थात 0.79 टक्क्यांच्या वाढीसह 55,818.11 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 105.25 अंकांच्या म्हणजेच 0.64 टक्क्यांच्या वाढीसह 16,628.00 वर बंद झाला.
बाजाराला मिड आणि स्मॉलकॅपकडून पाठिंबा वाढत असल्याने तेजी दिसत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. GST संकलन आणि PMI सारख्या हाय फ्रिक्वेंसी डेटाने आर्थिक वर्ष 2023 ची चांगली सुरुवात दाखवली आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण झाली असून, त्यामुळे भारतीय बाजारांमध्ये तेजी दिसून येत आहे. येत्या काळात भारत आणि अमेरिकेतील मध्यवर्ती बँकांच्या धोरणांवर बरेच काही अवलंबून असेल. यूएस फेड आणि रिझर्व्ह बँक पुढील 2 आठवड्यांत पॉलिसी मीट करतील.
हेही वाचा: 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांना विश्वास...
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
तांत्रिक दृष्टीकोनातून विचार केल्यास मंदीच्या सुरुवातीनंतर, निफ्टीने 16450 च्या जवळ सपोर्ट घेतला आणि इथून ट्रेंड बदलताना दिसल्याचे कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे श्रीकांत चौहान म्हणाले. इंट्राडे चार्टवर एक प्रॉमिसिंग रिव्हर्सल फॉर्मेशन आणि डेली चार्टवर एक लॉन्ग बुलिश कँडल बाजार बाजारात आणखी तेजी येण्याचे संकेत देत आहे. 16,550 पातळी ड्रे ट्रेडर्ससाठी ट्रेंड निर्णायक म्हणून काम करेल. ही पातळी तोडली तर निफ्टीमध्ये 16720 ही पातळी दिसून येईल. ही मजबूती कायम राहिल्यास निफ्टी 16800 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर निफ्टी 16,550 च्या खाली घसरला तर ही घसरण 16,450 पर्यंत जाऊ शकते.
2022 मध्ये बँकांनी NBFC ला दिलेल्या क्रेडिटमध्ये दुहेरी अंकी वाढ झाल्याच्या बातम्यांनंतर बाजारपेठ मजबूत झाल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांवर नजर टाकली तर आज विमान वाहतूक उद्योग ( Aviation Industry) फोकसमध्ये राहिला. एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात तेजी दिसली. आता निफ्टीला 16700 वर रझिस्टन्स दिसत आहे. दुसरीकडे, 16400 वर डाउनसाइडवर सपोर्ट दिसत आहे, तर बँक निफ्टीसाठी 36,200 वर रझिस्टन्स दिसत आहे आणि 35000 वर सपोर्ट दिसत आहे.
हेही वाचा: 'या' शेअरचा एका वर्षात 200 टक्के परतावा, आता खरेदी करणं फायद्याचं ठरेल का?
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
रिलायन्स (RELIANCE)
बजाज फायनान्स (BAJAJFIN)
सनफार्मा (SUNPHARMA)
टीसीएस (TCS)
एचसीएल टेक (HCLTECH)
एल अँड टी (LTTS)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
एम फॅसिस (MPHASIS)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDUPETRO)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Share Market Analysis Best Stock To Buy Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..