Share Market : हा शेअर घसरणीच्या मार्गावर, तज्ज्ञांचा अंदाज; तुमच्याकडे आहे का ?

चालू आर्थिक वर्ष 2022-23 ऑक्टोबर-डिसेंबर 2022 ची तिसरी तिमाही बर्जर पेंट्ससाठी चांगली ठरली नाही.
Share Market
Share MarketSakal

Share market : पेंट सेक्टरमधील बर्जर पेंट्सचे (Berger Paints)  शेअर्स गेल्या पाच दिवसांत दोन टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. पण शुक्रवारी ते एका वर्षाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले पण नंतर यात रिकव्हरी दिसली आणि तीन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

या शेअर्सने लाँग टर्ममध्ये त्यांच्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. पण देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने हे शेअर्स आणखी 9 टक्क्यांनी कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवला आहे आणि त्याला 505 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. (Share Market Berger Paints share likely to down expert said read story )

चालू आर्थिक वर्ष 2022-23 ऑक्टोबर-डिसेंबर 2022 ची तिसरी तिमाही बर्जर पेंट्ससाठी चांगली ठरली नाही. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत त्याची कमाई वार्षिक तुलनेत 13.4 टक्क्यांनी घसरली. लांबलेला मान्सून आणि मालाची जास्त किंमत यामुळे त्याच्या विक्रीवर परिणाम झाला.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, किमतीतील वाढ, स्पर्धेचा वाढता दबाव आणि अनऑर्गेनाइज्ड सेक्टरचा पुन्हा उदय यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 मधील महसूल वाढ आर्थिक वर्ष 2022-23 पेक्षा कमी असू शकते.

Share Market
Multibagger Stock: चक्क 49 हजाराच्या गुंतवणूकीचे झाले 1 कोटी, तुमच्याकडे हा शेअर आहे का?

लाँग टर्मचा विचार केल्यास बर्जर पेंट्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. 2 एप्रिल 2004 रोजी हा शेअर केवळ 4.85 रुपयांना होता. तो आता जवळपास 115 पटीने वाढून 557.50 रुपयांवर पोहोचला आहे, याचा अर्थ असा की, 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, बर्जर पेंट्सने 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1.15 कोटी रुपयांमध्ये परावर्तित केली आहे.

गेल्या वर्षी, त्याचे शेअर्स 3 फेब्रुवारी 2022 रोजी 745.60 रुपयांवर होते, जे त्याची एक वर्षातील विक्रमी उच्च पातळी आहे. पण, विक्रीच्या दबावाखाली वर्षभरात पुन्हा 29 टक्क्यांनी घसरून तो 527.60 रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर आला.

Share Market
Servotech Power Multibagger Stock : 6 महिन्यात 210 टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com