Servotech Power Multibagger Stock : 6 महिन्यात 210 टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का हा शेअर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Servotech Power Multibagger Stock

Servotech Power Multibagger Stock : 6 महिन्यात 210 टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

Servotech Power Multibagger Stock : तुम्हाला मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड (Servotech Power Systems) या स्मॉल-कॅप कंपनीचा विचार करु शकता. सर्व्होटेक सोलर प्रॉडक्ट्स, मेडिकल इक्विपमेंट्स आणि एनर्जी सॉल्यूशन्स प्रोव्हायडर आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना लाँग तसेच शॉर्ट टर्ममध्ये दमदार परतावा दिला आहे. कंपनीचा आयपीओ ऑगस्ट 2017 मध्ये आला होता. यासाठी कंपनीने प्रति शेअर 31 रुपयांचा प्राईस बँड निश्चित केला होता. सध्या हा शेअर 181.95 रुपयांवर आहे. याचा अर्थ या शेअरने आतापर्यंत तब्बल 600% परतावा दिला आहे.

सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने 21 जानेवारी 2023 रोजी झालेल्या बैठकीत डिव्हिडेंड घोषित केला आहे. इलेक्ट्रिक क्षेत्रात कार्यरत सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स त्यांच्या भागधारकांना प्रति इक्विटी शेअर 0.20 रुपये डिव्हिडेंड देईल असे फायलिंगमध्ये असे नमूद केले आहे. कंपनीने भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 3 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने प्रत्येकी 10 रुपये फेस व्हॅल्यूसह कंपनीच्या 5:1 इक्विटी शेअर्सच्या स्प्लिटींगला मान्यता दिली आहे. स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर, प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 2 रुपयांनी कमी केली जाईल.

हेही वाचा: Multibagger Stocks : 4 महिन्यात 485% वाढला हा मल्टीबॅगर शेअर, आता स्टॉक स्प्लिट...

गेल्या एका महिन्यात स्टॉक 33 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे तर त्यात 210 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढेच नाही तर या शेअरने गेल्या 5 वर्षांत 622 टक्के परतावा दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची रक्कम 15 महिन्यांत 9 पटीने वाढली आहे.

हेही वाचा: Stock Split : 1 वर्षात 'या' शेअरने दिला तब्बल 900% रिटर्न, आता होणार स्टॉक स्प्लिट

ऑक्टोबर 2021 मध्ये, सर्व्होटेकच्या एका शेअरची किंमत 19.05 रुपये होती, जी आज प्रति शेअर 181.95 रुपये झाली आहे. याचा अर्थ 15 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास 9.5 पटीने वाढले आहेत. जर तुम्ही ऑक्टोबर 2021 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तीच रक्कम सुमारे 9.5 लाख रुपये झाली असती.

हेही वाचा: Best Stock : 14 वर्षांत गुंतवणूकदार कोट्यधीश… आता याच शेअरची डिलिस्ट होण्याची तयारी…

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.