Share Market Closing : सेन्सेक्स 61,185 अंकांवर बंद; 'या' शेअर्समध्ये झाली वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market closing

Share Market Closing : सेन्सेक्स 61,185 अंकांवर बंद; 'या' शेअर्समध्ये झाली वाढ

Share Market Closing : आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार बंद झाला. सेन्सेक्स 235 अंकांनी वाढून 61,185 च्या पातळीवर बंद झाला आणि निफ्टी 85 अंकांच्या उसळीसह 18,202 च्या पातळीवर बंद झाला. आज ब्रिटानिया, एसबीआय, अदानी एंटरप्रायझेस, बीपीसीएल आणि आयशर मोटार हे सर्वाधिक वाढले. दिवी लॅब्स, एशियन पेंट्स, सिप्ला, सन फार्मा आणि अदानी पोर्ट्सला सर्वाधिक घसरण झाली. ब्रिटानियाने 8.43 टक्क्यांनी झेप घेतली.

7 नोव्हेंबर रोजी शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये वारंवार बदल होत होता. आज शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली, पण थोड्याच वेळात सेन्सेक्सने 400 अंकांची वाढ गमावली आणि निफ्टीनेही जवळपास 80 अंक गमावले. मात्र, बाजार बंद होताच पुन्हा एकदा निफ्टी आणि सेन्सेक्स त्यांच्या सुरुवातीच्या जवळपास बंद झाले. बँकिंग क्षेत्रात तुलनेने चांगली कामगिरी केली.

आज ब्रिटानियाच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांहून अधिक तेजी होती. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाचा (एसबीआयएन) शेअरही इंट्राडेमध्ये 5 टक्क्यांपर्यंत वाढला. निफ्टीच्या क्षेत्रांबद्दल बोलायचे झाल्यास, PSU बँकांमध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कोणत्याही निर्देशांकात 4 टक्क्यांची तेजी खूप मोठी मानली जाते.