Share Market Closing : बाजाराचा नवा विक्रम; सेन्सेक्स प्रथमच 62,500 च्या पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market Closing : बाजाराचा नवा विक्रम; सेन्सेक्स प्रथमच 62,500 च्या पार

Share Market Closing : आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आजच्या दिवसाच्या व्यवहारात विक्रमी उच्चांक गाठला. पहिल्यांदाच सेन्सेक्स 62,700 आणि निफ्टी 18,614 वर पोहोचला. रिलायन्सच्या शेअर्सने जबरदस्त तेजी दाखवली आणि आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 21 अंकांनी वाढून 62,504 या सर्वोच्च पातळीवर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 50 अंकांनी वाढून 62,504 वर पोहोचला. \

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

बाजारात आज आयटी, मीडिया, उपभोग आणि टिकाऊ वस्तू क्षेत्रातील समभागांची विक्री झाली. तर बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटीज आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांमध्येही तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 16 वाढीसह आणि 14 तोट्यासह बंद झाले. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 समभागांपैकी 27 समभाग लाल चिन्हात बंद झाले आहेत, तर 23 समभागांनी वेग पकडला आहे.

हेही वाचा: LIC Policy : 'या' विमा पॉलिसीमध्ये 45 रुपये गुंतवा! निवृत्तीनंतर मिळवा 36,000 रुपये पेन्शन

आज बाजारामध्ये रिलायन्सचे शेअर्स 3.40 टक्के, नेस्ले 1.41 टक्के, एशियन पेंट्स 1.38 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.03 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.67 टक्के, अॅक्सिस बँक 0.59 टक्के, इंडसइंड बँक 0.58 टक्के, अल्ट्रा 40 टक्के, एनटीपीसी 0.41 टक्क्यांच्या वाढीसह बाजार बंद झाला.