Share Market: Sensex 1056 अंकानी कोसळला; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका | Share Market Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market News Updates

Share Market: Sensex 1056 अंकानी कोसळला; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका

आठवड्याभरापासून शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात दिवसभर घसरण होती. अखेर मोठ्या घसरणीसह शेवटच्या सत्रात शेअर बाजार बंद झाला. आज सेन्सेक्स 1056 अंकाच्या घसरणीसह 58,877 वर बंद झाला तर निफ्टी 346 अंकाच्या घसरणीसह 17,530 वर बंद झाला.

आज सुरवातीच्या सत्रापासून शेअर बाजारात पडझड कायम होती. शेअर्स मध्ये अप्स अँड डाऊन दिसून आले. अखेर शेअर बाजार बंद होताना तब्बल 48 शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर फक्त दोन शेअर्समध्ये तेजी दिसून आली. CIPLA आणि INDUSINDBK या दोन शेअर्समध्ये तेजी तर विशेषत: आयटी, फार्मा आणि बँकीगचे शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.

हेही वाचा: Stock: एक लाखाचे साडेतीन कोटी! तुम्हाला माहितेय का 'हा' केमिकल स्टॉक…

आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजारात घसरण दिसून आली. आज सेन्सेक्स 233 अंकाच्या घसरणीसह 59,700 वर सुरू झाला तर निफ्टी 96 अंकाच्या घसरणीसह 17,781 वर सुरू झाला. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा आली आणि त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले

हेही वाचा: Share Market: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पडझड, आयटी, बॅंकीगच्या शेअर्समध्ये घसरण

2 शेअर्स येत्या काळात देतील तगडा परतावा

किर्लोस्कर फेरस(Kirloskar Ferrous)

बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी तुमच्यासाठी मेटल क्षेत्रातील किर्लोस्कर फेरसची (Kirloskar Ferrous) निवड केली आहे. ही कंपनी पिग आयर्न बनवणाऱ्या किर्लोस्कर ग्रुपची आहे. पिग आयर्नमध्ये कंपनीचा सुमारे 43 टक्के हिस्सा आहे. फेरस कास्टिंग्जमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 21 टक्के आहे.

आयआयएफएल फायनान्स (IIFL Finance)

विकास सेठींनी NBFC सेक्टरमधून दुसरा शेअर निवडला, ज्यामध्ये त्यांनी आयआयएफएल फायनान्सची (IIFL Finance) निवड केली आहे. या स्टॉकचे मूल्यांकनही खूप स्वस्त आहे. कंपनी 4 विभागांमध्ये कार्यरत आहे, ज्यात गृह कर्ज, गोल्ड लोन, मायक्रो फायनान्स आणि बिझनेस लोन यांचा समावेश आहे. कंपनीच्या एकूण आणि निव्वळ एनपीएमध्ये घट झाली आहे.

Web Title: Share Market Closing Update 16 September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..