Stock: एक लाखाचे साडेतीन कोटी! तुम्हाला माहितेय का 'हा' केमिकल स्टॉक… | Stock Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chemical stock

Stock: एक लाखाचे साडेतीन कोटी! तुम्हाला माहितेय का 'हा' केमिकल स्टॉक…

स्पेशालिटी केमिकल सेक्टरमधील दिग्गज कंपनी आरती इंडस्ट्रीजने (Aarti Industries) गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चांगली वाढ केली आहे. गेल्या पाच वर्षात गुंतवणूकदारांच्या भांडवलात चार पटीने वाढ झाली आहे. पण लाँग टर्म गुंतवणूकदारांची गोष्टच वेगळी आहे, कारण त्यांच्या 1 लाखाचे तब्बल 3.5 कोटी रुपये झालेत.

14 जुलै 1995 रोजी त्याचे शेअर्स केवळ 2.56 रुपयांवर होते, जे आज 34877 टक्क्यांनी वाढून 895.40 रुपये झालेत. म्हणजे त्यावेळी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे साडेतीन कोटी रुपये झाले असते.

हेही वाचा: Share Market : हे 2 दमदार स्टॉक्स देतील भरघोस कमाई, तज्ज्ञांना विश्वास

10 वर्षात गुंतवणूक 45 पट वाढली

दहा वर्षांपूर्वीही कुणीही यात गुंतवणूक केली असेल तर ती 14 सप्टेंबर 2012 रोजी 19.69 रुपये होती. तेव्हापासून त्याच्या किंमती जवळपास 45 पट वाढल्या आहेत. म्हणजे दहा वर्षांपूर्वी आरती इंडस्ट्रीजमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तरी ते 45 लाख झाले असते.

आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स गेल्या वर्षी 19 ऑक्टोबरला 1168.40 रुपयांवर होते, जी 52 आठवड्यांची विक्रमी उच्च पातळी आहे. पण, त्यानंतर घसरण झाली आणि त्यानंतर या वर्षी 20 जून रोजी तो विक्रमी उच्चांकावरून 43 टक्क्यांनी घसरून 669 रुपयांवर आला, जो 52 आठवड्यांचा विक्रमी नीचांक आहे. यानंतर ते पुन्हा सावरले आणि आतापर्यंत सुमारे 34 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता तो बीएसईवर 895.40 रुपयांवर बंद झाला आहे. पण तीरीही, त्याच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकावरून ते अजूनही 23 टक्के सूटवर आहे.

हेही वाचा: Stock market: 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरीट...

आरती इंडस्ट्रीज ही स्पेशॅलिटी केमिकल आणि फार्मा सेक्टरसाठी एपीआय (अऍक्टिव्ह फार्मा इंग्रिडियंट) इत्यादीची बनवणारी आघाडीची कंपनी असल्याचे कंपनीच्या वेबसाईटवर दिले आहे. त्यांची जगातील अनेक देशांमध्ये उपस्थिती आहे. हे फार्मा, ऍग्रोकेमिकल्स, पॉलिमर, ऍडिटीव्ह, सर्फॅक्टंट्स, पिगमेंट्स आणि रंग तयार करते.

आरती इंडस्ट्रीजचे 2022-23 च्या एप्रिल-जून 2022 च्या पहिल्या तिमाहीत, तिमाही आधारावर निव्वळ नफा 18.95 कोटी रुपयांवरून 18.58 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला. पण, याच कालावधीतील महसूल 171.77 कोटी रुपयांवरून 193.47 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

हेही वाचा: Stock: 'या' मल्टीबॅगर हॉटेल स्टॉकचा एका वर्षात 104% परतावा

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Share Market This Chemical Stock Company Increased Income Of Investors By Four Times

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..