
शेअर बाजारात पडझड, 'या' बड्या कंपन्यांचे शेअर्स घसरले
सलग दोन दिवसापासून शेअर बाजारात तेजी होती. आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह सुरू झाला. दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता होती. अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 100 अंकानी 53,134 वर बंद झाला तर निफ्टी 27 अंकानी 15,800 वर बंद झाला.
आज शेअर बाजारात 22 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर 28 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. यात प्रामुख्याने HDFCLIFE, WIPRO, AXISBANK, INDUSINDBK, TCS, KOTAKBANK, HDFC, ICICIBANK यासह 28 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
हेही वाचा: भारतात २०२३ सालापर्यंत स्टार्टअप मधून तब्बल ५० हजार नोकऱ्या जाणार
शेअर बाजारात पहिल्याच सत्राची तेजीने सुरवात झाली. सेन्सेक्स 250 अंकांनी 53,480 वर सुरू झाला तर निफ्टी 64 अंकानी 15,900 वर सुरू झाला. आज बाजार जरी तेजीने सुरू झाला तरी दिवसभर गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम होती.
सोमवारी शेअर बाजार वाढीसह अर्थात बंद झाला होता. एफएमसीजी आणि फायनान्शियल शेअर्सकडून बाजाराला चांगला सपौर्ट मिळाला होता. सेन्सेक्स 326.84 अंकांच्या अर्थात 0.62 टक्क्यांच्या वाढीसह 53,234.77 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 83.30 अंक म्हणजेच 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 15,835.35 वर बंद झाला.
हेही वाचा: Gold-Silver Price: सोने-चांदीचे दर आजही स्थिर; खरेदीची उत्तम वेळ
युरोपीय बाजारातील स्थिती सुधारणे, कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, रुपयाची कमजोरी थांबल्याने बाजाराला साथ मिळाली. पण या रिकव्हरीनंतरही, मंदी आणि अस्थिर वातावरणाचे बाजारावर वर्चस्व असेल कारण FII ची विक्री सुरूच आहे ज्याचा गुंतवणूकदारांवर परिणाम होत आहे.
Web Title: Share Market Closing Update 5 July 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..