Gold-Silver Price: सोने-चांदीचे दर आजही स्थिर; खरेदीची उत्तम वेळ | Todays Gold, Silver Rate Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Todays Gold, Silver price Updates

Gold-Silver Price: सोने-चांदीचे दर आजही स्थिर; खरेदीची उत्तम वेळ

या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. आठवड्याच्या शेवटी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र सोमवारी सोन्याचे भाव स्थिर दिसून आले. आजही सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. (Gold silver update 5 july 2022)

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,000 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,340 रुपये आहे तर आज चांदीचे दरही स्थिर असून 10 ग्रॅम चांदीचा दर 578 रुपये आहे. (Todays Gold, Silver price Updates)

हेही वाचा: बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 52,480 रुपये

दिल्ली - 52,340 रुपये

हैदराबाद - 52,340 रुपये

कोलकत्ता - 52,340 रुपये

लखनऊ - 52,490 रुपये

मुंबई - 52,340 रुपये

नागपूर - 52,390 रुपये

पूणे - 52,390 रुपये

हेही वाचा: शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा: पॅरासिटामॉल-कॅफिनची गोळी आता मिळणार अवघ्या २.८८ रुपयांना !

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Web Title: Todays Gold Update 5 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top