Tue, Sept 26, 2023

Share Market: अस्थिरतेनंतर शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स मध्ये 48 तर निफ्टीत 10 अंकांची घट
Published on : 6 September 2022, 10:21 am
शेअर बाजाराची पहिल्या सत्राची सुरुवात सावधपणे झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 50 अंकांच्या घसरणीसह स्थिरावला तर निफ्टीमध्ये 10 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.08 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,196 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.06 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,655 अंकांवर स्थिरावला आहे. आज दिवसभरात शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली.
तर आज सुरवतीच्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 276 अंकांच्या तेजीसह 59,080 अंकांवर खुला झाला होता. तर, निफ्टी 82 अंकांच्या तेजीसह 17,629 अंकांवर खुला झाला होता.
आज शेअर बाजारात आयटी, मेटल, एफएमसीजी, बँक आणि रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याचे दिसून आले आहे. तर उर्जा आणि आरोग्य क्षेत्रातल्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आले आहे.