esakal | निफ्टीने ओलांडली १०,००० अंशांची पातळी, सेन्सेक्सही ३४,०००च्या पार
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

शेअर बाजाराने घोडदौड कायम राखली आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीमध्ये तेजी दिसून आली. निफ्टी महत्त्वाचा १०,००० अंशांचा टप्पा ओलांडला आहे तर सेन्सेक्सने ३४,००० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात चांगली सुधारणा होते आहे.

निफ्टीने ओलांडली १०,००० अंशांची पातळी, सेन्सेक्सही ३४,०००च्या पार

sakal_logo
By
पीटीआय

शेअर बाजाराने घोडदौड कायम राखली आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीमध्ये तेजी दिसून आली. निफ्टी महत्त्वाचा १०,००० अंशांचा टप्पा ओलांडला आहे तर सेन्सेक्सने ३४,००० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात चांगली सुधारणा होते आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४२ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४०० अंशांची उसळी सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३४,२२८ अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी १०,११८ अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक शेअर बाजारांमध्येही तेजी नोंदवण्यात आल्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रात मोठी तेजी दिसते आहे. मॉन्सूनचे वेळेवर आगमन होण्याच्या वृत्ताचाही अनुकुल परिणाम निर्देशांकांवर झाला आहे.

तेजीसह शेअर बाजाराची चढती कमान; सलग पाचव्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वधारले

निफ्टी बॅंक निर्देशांकात अधिक तेजी बाजार सुरू झाल्यानंतर नोंदवण्यात आली. याशिवाय इतरही निर्देशांकांमध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे.

सरकारने लॉकडाऊनमधून बाहेर पडत अर्थव्यवस्था खुली करण्याच्या दिशेने पावले उचलल्याने शेअर बाजारात तेजीचे वारे वाहू लागले आहेत. बजाज फायनान्स, एचडीएफसी बॅंक, एसबीआय आणि रिलायन्स या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत चांगली वाढ झाली आहे. तर भारती एअरटेलच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे.

तीनपैकी एक एमएसएमई बंद पडण्याच्या मार्गावर

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही तेजी नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २८४५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र थोडी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ०.०२ रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.३९ रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

* सेन्सेक्स ३४,२०० अंशांच्या पातळीवर
* निफ्टी १०,१०० अंशांच्या पातळीच्या वर 
* निफ्टीमध्ये १४० अंशांची उसळी
* सेन्सेक्समध्ये ४०० अंशांची उसळी