
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५२२ अंशांनी वधारून ३३,८२५ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५२ अंशांची वाढ झाली. तो ९,९७८ अंशांवर बंद झाला.
तेजीसह शेअर बाजाराची चढती कमान; सलग पाचव्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वधारले
मुंबई - शेअर बाजार सलग पाचव्या सत्रात तेजीसह बंद होण्यास यशस्वी झाला आहे. देशभरात लॉकडाउन शिथिल करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने अनलॉक-१ जाहीर केल्यानंतर उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. मंगळवारी सकाळपासून गुंतवणूकदारांनी सुरू केलेल्या चौफेर खरेदीने बाजारात तेजीचे वातावरण होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५२२ अंशांनी वधारून ३३,८२५ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५२ अंशांची वाढ झाली. तो ९,९७८ अंशांवर बंद झाला.
जागतिक पतमानांकन संस्था 'मुडीज'ने भारताचे मानांकनात घट केली आहे. मात्र, शेअर बाजारावर याचा परिणाम झाला नसून गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी ओघ सुरू ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय उद्योग महासंघाच्या १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशातील उद्योजकांना संबोधित केले. कोरोनामुळे संकटात सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा घटक, 'आरोग्य विमा'
'अनलॉक-१' मुळे उद्योग-व्यवसाय पुन्हा कार्यान्वित होत आहे. बऱ्याच दिवसांपासून बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली आहे. परिणामी विमान कंपन्यांच्या शेअर मंगळवारी वधारले. क्षेत्रीय पातळीवर बॅंक निफ्टी आणि ऑटो निर्देशांक बाजार सुरू होताच वधारले. सेन्सेक्सच्या मंचावर आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे शेअर वधारून बंद झाले.
शेअर वधारले:
एचडीएफसी, कोटक बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक
शेअर घसरले
मारुती सुझुकी, आयटीसी, एनटीपीसी, भारती एअरटेल, हिरो मोटोकॉर्प, हिंदुस्थान युनिलिव्हर
श्रीमंत होत रिटायर होण्यासाठी लक्षात घ्या 'या' टिप्स
कच्च्या तेलाचे दर वधारले
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) कच्चे तेल २,७०६ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. तसेच जागतिक बाजारात क्रूड ऑईल दर ८८ सेंटने वधारून ३९.२० डॉलर प्रतिबॅरलवर पोचले.
Web Title: Share Market Conitues bull Run Sensex Nifty End Higher Fifth Session
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..