Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार तेजीत बंद, गुंतवणुकदारांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sensex share market.

Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार तेजीत बंद, गुंतवणुकदारांना दिलासा

Share Market Update : या आठवड्यातील शेवटच्या दिवशी शेअर बाजारात चांगली तेजी पहायला मिळाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात वाढ झाली असून सेन्सेक्स 130 अंकानी वाढून 59,462 वर बंद झाला तर निफ्टी 39 अंकाच्या वाढीसह 17,698 वर बंद झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांना आज बऱ्यापैकी नफा झाल्याचं चित्र आहे. दरम्यान मागच्या आठवड्यात शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली होती.

(Share Market Updates)

आज शेअर बाजारात आज काही शेअर्समध्ये तेजी होती. यामध्ये प्रामुख्याने ONGC, NTPC,TATASTEEL,UPL आणि POWERGRID या शेअर्सचा सामावेश आहे. त्याचबरोबर DIVISLAB, APOLLOHOSP, INFY,MARUTI, TATACONSUM या शेअर्समध्ये प्रामुख्याने घसरण झाली आहे. तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या सरासरीमध्ये आज वाढ झाल्यामुळे आज गुंतवणुकदारांना चांगला नफा झाल्याचं चित्र आहे. दरम्यान आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजारात तेजी राहिल्यामुळे गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला आहे.