Share Market: सेन्सेक्स 460 तर निफ्टी 142 अंकांनी घसरला; AXISBANK, COALINDIA शेअर्समध्ये घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Latest News Updates
Share Market: सेन्सेक्स 460 तर निफ्टी 142 अंकांनी घसरला; AXISBANK, COALINDIA शेअर्समध्ये घसरण

Share Market: सेन्सेक्स 460 तर निफ्टी 142 अंकांनी घसरला; AXISBANK, COALINDIA शेअर्समध्ये घसरण

आज सकाळी सकारात्मक कामगिरीनंतर दिवसअखेर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सकाळी शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली होती. त्यानंतर दिवसभर शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली होती मात्र दुपारनंतर शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्समध्ये 460.19 अंकांनी म्हणजेच 0.80 टक्क्यांनी घसरून 57060.87वर बंद झाला. तर निफ्टी 142.50 अंकांनी म्हणजेच 0.83 टक्क्यांनी घसरून 17,102.55वर बंद झाला. निफ्टी 50 मधील HDFCLIFE, TATACONSUM, KOTAKBANK यांसह 12 शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली. तर AXISBANK, COALINDIA, ADANIPORTS, WIPRO यांसह 38 शेअर्समध्ये घसरण झाली.

शेअर बाजारामध्ये काल मंथली एक्सपायरीदिवशी तेजी दिसून आली होती. आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाही शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आज हिरव्या चिन्हात सुरु झाले. आज सेन्सेक्स (Sensex) 296.45 अंकांनी वधारून 57,817.51वर सुरु झाला तर निफ्टी (Nifty) 84.2 अंकांनी वधारून 17,329.25 वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील 39 शेअर्सने सकारात्मक ओपनिंग दिलं तर 11 शेअर्समध्ये दिवसाची सुरुवात घसरणीने झाली. ONGC, SUNPHARMA, TATASTEEL, GRASIM मध्ये चांगली वाढ झाली तर SBILIFE, AXISBANK, HEROMOTOCO, DIVISLAB मध्ये घट नोंदवली गेली.

तत्पूर्वी काल बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत होते तेजीत होते. एफएमसीजी, पॉवर, पीएसई समभाग सर्वाधिक वाढले. आयटी, इन्फ्रा, बँकिंग शेअर्समध्येही खरेदी झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.31 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला तर स्मॉलकॅप इंडेक्स 0.08 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 701.67 अंकांच्या म्हणजेच 1.23 टक्क्यांच्या वाढीसह 57,521.06 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 206.65 अंकांच्या अर्थात1.21 टक्क्यांच्या वाढीसह 17245.05 वर बंद झाला.