शेअर बाजारात किरकोळ घसरण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

मुंबई - जागतिक बाजारपेठेतील संमिश्र वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५० अंशांनी घट होत ३८,९८१ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत २३ अंशांनी घसरून ११,७२४ अंशांवर बंद झाला. फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात कोणतीही कपात न करता ते ’जैसे थे’ ठेवले आहेत. उत्पादन क्षेत्राची कामगिरी एप्रिल महिन्यात खालावल्याचे समोर आले असून, याचे पडसाद बाजारावर उमटले. आज बॅंकिंग व ऑटो क्षेत्रात विक्रीचा मारा होता.

मुंबई - जागतिक बाजारपेठेतील संमिश्र वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५० अंशांनी घट होत ३८,९८१ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत २३ अंशांनी घसरून ११,७२४ अंशांवर बंद झाला. फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात कोणतीही कपात न करता ते ’जैसे थे’ ठेवले आहेत. उत्पादन क्षेत्राची कामगिरी एप्रिल महिन्यात खालावल्याचे समोर आले असून, याचे पडसाद बाजारावर उमटले. आज बॅंकिंग व ऑटो क्षेत्रात विक्रीचा मारा होता. सेन्सेक्‍स मंचावर टाटा मोटर्सचा शेअर सर्वाधिक ३.२९ टक्‍क्‍यांनी घसरला, तर येस बॅंकेचा शेअर ३.४५ टक्‍क्‍यांनी वधारला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market Decrease