शेअर बाजारात तेजीचे वारे

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 5 February 2019

मुंबई - पतधोरणाच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ११३ अंशांची वाढ झाली. तो ३६ हजार ५८२.७४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात १८.६० अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१२.२५ वर बंद झाला. दिवाळखोरीत निघालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या शेअर्सची आजच्या सत्रात धूळधाण उडाली. रिलायन्स कम्युनिकेशनचा शेअर ५० टक्‍क्‍यांपर्यंत घसरला होता, अखेर तो ३४ टक्‍क्‍यांच्या घसरणीसह बंद झाला. 

सकाळच्या सत्रात बाजारावर अंतरिम अर्थसंकल्पाची छाप दिसून आली. निर्देशांकाने ४०० अंशांची डुबकी घेतली होती. मात्र, बड्या शेअर्समधील खरेदीने तो सावरला. आजच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. त्याखालोखाल ओएनजीसी, बजाज ऑटो, कोटक बॅंक, टीसीएस, टाटा स्टील, ॲक्‍सिस बॅंक, मारुती सुझुकी, एचडीएफसी, एचयूएल आदी शेअर तीन टक्‍क्‍यांनी वधारले. मात्र, पॉवरग्रीड, येस बॅंक, एनटीपीसी, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, एलअँडटी आणि बजाज फायनान्स आदी शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांच्या शेअर्सला आज मागणी दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप आदी शेअर वधारले. शुक्रवारी (ता.१) परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १,३१५ कोटींचे शेअर खरेदी केले. आशिया आणि युरोपातील शेअर बाजारांमध्ये तेजी होती.

रुपयात ५५ पैशांचे अवमूल्यन 
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये ५५ पैशांचे अवमूल्यन झाले. दिवसअखेर तो ७१.८० वर बंद झाला. रुपयाचा १७ डिसेंबरनंतरचा हा नीचांकी स्तर आहे. सलग दुसऱ्या सत्रात रुपयाचे अवमूल्यन झाले असून, यात ७२ पैसे गमावले आहे. कच्च्या तेलाच्या भावात सलग पाचव्या सत्रात वाढ झाली असून, त्याचा भाव सहा टक्‍क्‍यांनी वधारला आहे. परिणामी, चलन बाजारावर परिणाम होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market Increase