
देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय डायरेक्ट सध्या आयशर मोटर्सबबात (Eicher Motors) सकारात्मक दिसत आहे. 250 CC पेक्षा जास्त प्रीमियम मोटरसायकल सेगमेंटमध्ये आयशर मोटर्स मार्केट लीडर असल्याचे आयसीआयसीआय डायरेक्टने प्रसिद्ध केलेल्या रिसर्च रिपोर्टमध्ये असे नमूद केले आहे.
या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्ड (RE) ब्रँडचे वर्चस्व असले तरी या विभागात आयशर मोटर्सचा बाजारातील हिस्सा 85 टक्क्यांहून अधिक आहे. .
कंपनीने 650 सीसी सेगमेंटमध्ये नवीन लॉन्च करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिड-वेट सेगमेंटमध्ये चांगली छाप पाडली आहे. व्होल्वोसह व्हीईसीव्हीसारख्या (VECV) कंपन्यांसोबत जॉइंट व्हेंचर स्थापन करून कंपन्यांच्या व्यावसायिक वाहन विभागात आपले स्थान मजबूत केले आहे.
2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीची व्हॉल्यूम मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच आयसीआयसीआय डायरेक्टने आयशर मोटर्सला बाय रेटिंग (Buy Rating) दिले आहे आणि त्यासाठी 4,170 रुपयांचे टारगेट दिले आहे.
नुकताच हा शेअर एनएसईवर 47.40 रुपये अर्थात 1.38 टक्क्यांच्या वाढीसह 3,473.15 रुपयांवर बंद झाला. स्टॉकचा इंट्राडे हाय 3,482.00 रुपये होता तर इंट्राडे लो 3,427.25 रुपये होता. स्टॉकचे सध्याचे प्रमाण 15,790 शेअर्स आहे.
25 ऑगस्ट 2022 ला या शेअरने 3,512.75 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता, तर 07 मार्च 2022 ला या शेअरने 2,110.00 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. सध्या, स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 1.06 टक्क्यांनी खाली व्यापार करत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 95,045.41 कोटी रुपये आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.