
अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सची मोठी उसळी
भारताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्स 724.1 अंकांनी वधारला असून निर्देशांक 57,924.33 अंकांवर पोहोचला आहे. निफ्टीतही २१६.३५ अंकांनी वाढ झाली असून सध्या निफ्टी १७ हजार ३१८.३० अकांवर आहे. संसदेत आज आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार आहे. यात नऊ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो.
२०२२ वर्षासाठी सर्व्हेमध्ये जीडीपी ९ ते ९५ टक्के राहण्याची शक्यता आहे. महागाई वाढण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर बाजारात सध्या तेजी बघायला मिळाली आहे. शेअर बाजार उघडताच ६९३ अंकांनी उसळी घेतली. सेन्सेक्सने १.३ टक्क्यांच्या वाढीसह ५७ हजार ९३६.३५ वर मजल मारली. त्यानंतर निफ्टीतही वाढ होऊन निर्देशांक १७ हजार ३०१ अंकांवर पोहोचला.
निफ्टी ग्रीन झोनमध्ये दिसून आला तर त्याच्या ३ शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसलं. बँक निफ्टीतही १.०८ टक्क्यांची वाढ झाली असून तो ३८ हजार ९७ पर्यंत पोहोचला होता. विप्रो निफ्टीच्या ३.३६ वाढीसह असून ओएनजीसीमध्ये ३.२९ टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय टेक महिंद्रा, टायटन आणि Divi's Lab सुद्धा ग्रीन झोनमध्ये आहेत.
Web Title: Share Market Opening Sensex Nifty Green Zone
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..