Share Market Updates| शेअर बाजारात उसळण; सेन्सेक्स निफ्टी पुन्हा तेजीच्या वाटेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Todays Share Market Updates | Stock Market news

Share Market: शेअर बाजारात उसळण; सेन्सेक्स निफ्टी पुन्हा तेजीच्या वाटेवर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने त्याचा परीणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. मात्र आज शेअर बाजार तेजीसह उघडला आणि प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्स आणि निफ्टी चांगल्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे. (Todays Share Market Updates)

सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला तर निफ्टी 18,050 अंकानी वर आली. शेअर बाजाराचा येणारा काळ खूपच सकारात्मक दिसत असून निफ्टी डेली चार्टवर फॉलिंग ट्रेड लाइनकडे जाताना दिसतो. निफ्टीचा पहिला रझिस्टंस 18,150 वर दिसतो, तर 17,800 वर सपोर्ट दिसत आहे.

हेही वाचा: Gold Price Update : मस्तच'लगीन घाई'च्या मुहूर्तावर सोनं झाल स्वस्त!

एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसी यांच्या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर, भारतीय इक्विटी मार्केट सोमवारी 2 टक्क्यांहून अधिक वधारला होता. विशेष म्हणजे या विलीनीकरणामुळे मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आकार घेईल.

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) 60,845.10 आणि 18,114.65 च्या पातळीवर पोहोचले. सोमवारी व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1335.05 अंकांच्या अर्थात 2.25 टक्क्यांच्या वाढीसह 60,611.74 वर बंद झाला होता. दुसरीकडे, निफ्टी 382.95 अंकांच्या अर्थात 2.17 टक्क्यांच्या वाढीसह 18053.40 वर बंद झाला होता.

हेही वाचा: Petrol Rate : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ! जाणून घ्या नवे दर

एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या विलीनीकरण घोषणेमुळे देशांतर्गत बाजारात जोरदार तेजी दिसून आल्याचे चित्र आहे. या आठवड्यात होणाऱ्या आरबीआयच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

Web Title: Share Market Opening Todays Update Ndj97

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top