सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण |Share Market Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Todays Updates | Stock Market news

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

आज बुधवारीही सुरवातीच्या सत्रात शेअर बाजारात घसरण कायम पाहायला मिळाली. आज सेन्सेक्स 75.91अकांनी खाली घसरला तर निफ्टीने 16,230 वर आहे. शेअर बाजारात गेल्या दोन दिवसापासून अस्थिरता कायम आहे.

मंगळवारीही शेअर बाजार घसरणीसह अर्थात लाल चिन्हात बंद झाला. संमिश्र जागतिक संकेतांमुळे एफएमसीजी आणि बँक वगळता सर्व सेक्टर्समध्ये विक्री दिसून आली. शेवटी, सेन्सेक्स 105.82 अंकांनी अर्थात 0.19 टक्क्यांनी घसरून 54,364.85 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 61.80 अंकांनी अर्थात 0.38 टक्क्यांनी घसरून 16,240.05 वर बंद झाला. (Share Market Todays Updates)

हेही वाचा: येत्या काळात या 2 मेटल शेअर्समध्ये दिसेल मजबूत तेजी, आताच खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

सेंट्रल बँकेने चलन विनिमय करूनही, कमजोर झालेल्या रुपयामुळे आयटी स्टॉकवर दबाव होता असे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन यांचे म्हणाले. पण, एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मेटल स्टॉकमध्ये मोठी घसरण दिसून आली. मेटल इंडेक्स 5 टक्क्यांहून अधिक घसरला.

हेही वाचा: शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी एक नजर टाका आज परफॉर्म करणाऱ्या 10 शेअर्सवर

आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर मागील आठवड्यापासून सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसापासून शेअर बाजारात पडझड दिसून येत आहे.

Web Title: Share Market Opening Update 11 May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top