Share Market: शेअर बाजारात सकारात्मकता कायम; सेन्सेक्स 66 अंकानी वधारला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Updates

Share Market: शेअर बाजारात सकारात्मकता कायम; सेन्सेक्स 66 अंकानी वधारला

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्याभरापासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत होती. आज मात्र सुरवातीच्या सत्रात शेअर बाजाराची सुरवात सकारात्मकतेने सुरू झाला आहे. आज बाजारात सेन्सेक्स 66 अंकाच्या तेजीसह 61,814 वर सुरू झाला तर निफ्टी 22 अंकाच्या तेजीसह 18,372 वर सुरू झाला. आज सुरवातीच्या सत्रात 29 शेअर्समध्ये तेजी तर 21 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. ( share market update 1November 2022)

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

अमेरिकेत किरकोळ महागाई कमी झाल्याच्या बातम्यांमुळे जागतिक बाजारात तेजी दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. आता जगभरातील सेंट्रल बँका व्याजदरांबाबत आपली भूमिका बदलतील अशी शक्यता वाढली आहे. मागच्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सकारात्मक परतावा दिसला. दुसरीकडे, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात थोडीशी घसरण झाल्याचे ते म्हणाले. (Share Market)

हेही वाचा: Share Market: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

जगभरातील गुंतवणूकदारांनी अमेरिकेत महागाई कमी होण्याच्या बातमीचे स्वागत केलं, त्यामुळे भारतीय बाजारात सकारात्मक वातावरण दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. आता यूएस फेड डिसेंबरच्या बैठकीत व्याजदरांबाबत नरम भूमिका ठेवेल आणि त्यामुळे महागाई कमी होईल असेही ते म्हणाले. निफ्टीने 18300 चा शॉर्ट टर्म रझिस्टंस तोडला आणि त्याच्या वर बंद झाला. बाजारासाठी हे चांगले संकेत आहेत. डेली आणि विकली चार्टवर बुलिश कँडल आणि रेंज ब्रेकआउट फॉर्मेशन येत्या काळात तेजी येण्याचे संकेत देत आहे.


आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एचडीएफसी (HDFC)

एचडीएफसी बँक (HDFCBANK)

इन्फोसिस (INFY)

टेक महिन्द्रा (TECHM)

एचसीएल टेक (HCLTECH)

झिंदाल स्टील (JINDALSTEL)

गोजरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

ऑरो फार्मा (AUROPHARMA)