Share Market: शेअर बाजारात घसरणीनंतर तेजी; Sensex 274 तर Nifty 75 अंकांनी वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market.

Share Market: शेअर बाजारात घसरणीनंतर तेजी; Sensex 274 तर Nifty 75 अंकांनी वाढला

गेले दोन दिवस शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीला ब्रेक लागला आहे. शेअर बाजारात आज काहीशा वाढीसह सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सुरवतीच्या सत्रात सेन्सेक्स 309 अंकांच्या तेजीसह 59,394 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी 91 अंकांच्या तेजीसह 17,689 अंकांवर खुला झाला आहे. आज शेअर बाजारात दिवसभरात तेजी दिसून येईल असा अंदाज गुंतवणूकदारांकडून वर्तवण्यात येत आहे. आज सुरवातीला 45 शेअर तेजीत दिसत आहेत, तर पाच शेअर पडल्याचे दिसून येत आहे.

तर काल सेन्सेक्स 54.13 अंकांच्या म्हणजेच 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 59,085.43 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 24.50 अंकांच्या म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 17,602.00 वर बंद झाला.

हेही वाचा: बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी 23 ऑगस्ट रोजी 18000 स्तरावरून घसरणीच्या पहिल्या टप्प्यात त्याच्या 20-DMA जवळ सपोर्ट घेताना दिसल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. तेव्हापासून निफ्टी हलकी उसळी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी वर आणि खाली ट्रेंड करत आहे आणि आता तो त्याच्या 40-hour EMA आणि अवरली अप्पर बोलिंजर बँडच्या बैठक बिंदूवर पोहोचला आहे.

खाली निफ्टीला 17350-17300 वर पहिला सपोर्ट दिसतो. हा सपोर्ट तुटला तर निफ्टी अल्पावधीत 17000 पर्यंत घसरताना दिसू शकतो. दुसरीकडे, निफ्टीने वरच्या बाजूने 17650-17700 ची पातळी ओलांडली, तर तेजी दिसू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • ओएनजीसी (ONGC)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • एनटीपीसी (NTPC)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

Web Title: Share Market Opening Update 25 August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..