Share Market: शेअर बाजार पडझड सुरूच, सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Updates

Share Market: शेअर बाजार पडझड सुरूच, सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला

शेअर बाजाराची आजच्या व्यवहाराची सुरुवातही घसरणीसह झाली आहे. शेअर बाजारात बाजारात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन शेअर बाजार आणि जागतिक शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला आहे. शेअर बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर बाजारात विक्रीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची पडझड दिसून आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 136.85 अंकांनी घसरत 16,870  अंकांवर खुला झाला.

सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 379 अंकांच्या घसरणीसह 56,728.45 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह 16,896.70 अंकांवर व्यवहार करत होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बेंचमार्क इंडेक्सेस मंगळवारी किंचित कमजोरीसह बंद झाल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. निफ्टी 0.05 टक्क्यांनी घसरून बंद झाला. तर सेन्सेक्स 0.07 टक्क्यांनी घसरून बंद झाला. निफ्टीमध्ये 16,800 वर सपोर्ट दिसून येत आहे. त्याच वेळी, रझिस्टंस 17,400 वर दिसत आहे. बँक निफ्टीमध्ये, 38,000 च्या पातळीवर सपोर्ट दिसत आहे, तर रझिस्टंस 39,000 वर दिसत आहे.

बेंचमार्क निफ्टी आरबीआयच्या पॉलिसी मीटिंगमुळे रेंजमध्ये ट्रेडिंग करताना दिसेल असे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. मोमेंटम इंडिकेटर मंदीच्या क्रॉसओव्हरमध्ये दिसत आहे. ट्रेंड कमकुवत राहण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. पण, सपोर्ट लेव्हलवरून पुलबॅक रॅलीची शक्यता नाकारता येत नाही.

निफ्टीमध्ये 17,150-17,200 लेव्हलवर रझिस्टंस दिसत असल्याचे रुपक डे म्हणाले. जर निफ्टी 17,200 च्या बाहेर पडला तर तो 17,500 च्या दिशेने जाऊ शकतो. दुसरीकडे, 16,950 खालील घसरण पॅनिक बटण ट्रिगर करू शकतो, त्यामुळे निफ्टीमध्ये मोठी घसरण होऊ शकते असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिरो मोटोकॉर्प (HEROMOTOCORP)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
टायटन (TITAN)
टाटा स्टील (TATASTEEL)
एसबीआय लाईफ (SBILIFE)
भारत फोर्ज (BHARATFORG)
हिंदुस्थान एअरोनॉटीक्स लिमिटेड (HAL)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
ऍस्ट्रल (ASTRAL)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)