
Share Market: शेअर बाजारात तेजी, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम
Share Market Update: आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात अस्थिरता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक पाहायला मिळतेय. मंगळवारी शेअर बाजार प्रचंड अस्थिरतेसह घसरणीसह बंद झाला. मात्र आज शेअर बाजार तेजीसह सुरू झाला. सेन्सेक्स 235 अंकांच्या तेजीसह 53,371वर सुरू झाला तर निफ्टी 50 अंकांच्या तेजीसह 15,860 वर सुरू झाला.
आज शेअर बाजारात २८ कंपन्याचे शेअर्समध्ये घसरण दिसत आहे तर २२ कंपन्याच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. त्यामुळे दिवसभर शेअर बाजारात काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष असणार.
मंगळवारी शेअर बाजार लाल रंगात अर्थात घसरणीसह बंद झाला. बाजारात मंगळवारी बरीच उलथापालथ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 100.42 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 53,134.35 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 24.50 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 15,810.85 वर बंद झाला.
भारतीय इक्विटी मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. विक्रीचा हा दबाव असूनही, निफ्टीने नजीकच्या काळात त्याच्या मूव्हिंग एव्हरेजवर राहण्यात यश मिळविले. जोपर्यंत निफ्टी 15800 च्या वर राहील तोपर्यंत कल सकारात्मक असण्याची अपेक्षा आहे. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 16000 आणि 16200 वर रझिस्टंस दिसून येत आहे.
निफ्टी सध्या त्याच्या घसरत्या ट्रेंड लाइनच्या वर टिकू शकला नाही असे निफ्टीचा आवर्ली चार्ट दाखवतो. याचा अर्थ शॉर्ट टर्म पॉझिटीव्ह मोमेंट संपण्याचे संकेत आहेत. निफ्टीसाठी 15750-15800 वर पहिला सपोर्ट आहे. एकुणच निफ्टी कंसोलिडेशन मोडमध्ये आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये तो तो 15500-16000 च्या रेंजमध्ये फिरताना दिसेल असे शेअर खानचे गौरव रत्नपारखी म्हणाले.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
श्री सिमेंट (SHREECEM)
पॉवरग्रीड (POWERGRID)
बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINUNILVR)
अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
भारत फोर्ज (BHARATFORG)
पेज इंडिया (PAGEIND)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
Web Title: Share Market Opening Update 6 July 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..