Share Market Opening Update : शेअर बाजारात पडझडीचं सत्र थांबलं, सेन्सेक्सने घेतली भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Update

Share Market Opening Update : शेअर बाजारात पडझडीचं सत्र थांबलं, सेन्सेक्सने घेतली भरारी

मंगळवार शेअर बाजारासाठी आश्वासक सुरुवात घेऊन आला आहे. गेले अनेक दिवस बाजारात पडझड पाहायला मिळत होती. तिथेच आज मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही चांगली भरारी घेतली आहे.सेन्सेक्स 150 अंकांच्या वाढीसह 61 हजार 292 च्या पातळीवर उघडला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही हिरव्या चिन्हासह दिवसाच्या व्यवहाराची सुरुवात केली. निफ्टी 50 अंकांच्या तेजीसह 18 हजार 202 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज सकाळच्या सत्रात 33 शेअर तेजीत असून 16 शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत. काल शेअर बाजारात घसरण दिसून आली होती.

हे ही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी कमकुवत जागतिक संकेतांमुळे घसरणीसह सुरू झाला आणि दिवसभर साइडवेज राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. खाली निफ्टी 18100 च्या आधीच्या स्विंग हायच्या दिशेने सरकताना दिसला.

डेली टाइमफ्रेमवर राउंडिंग टॉप फॉर्मेशनसह आता बाजाराचा कल कमजोर दिसत असल्याचे ते म्हणाले. आरएसआयमधील बियरीश क्रॉसओव्हर तसेच नकारात्मक डायव्हर्जन बाजारात आणखी कमजोरी दर्शवते असेही ते म्हणाले.

पुढे जाऊन निफ्टीला पहिला सपोर्ट 18100 वर दिसत आहे. जर हा सपोर्ट तुटला तर ही घसरण 17750 पर्यंत जाऊ शकते. दुसरीकडे, निफ्टीसाठी 18200 आणि 18400 वर रझिस्टंस दिसत आहे.

हेही वाचा: बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

टेक महिन्द्रा (TECHM)

हिरो मोटोकॉर्प (HEROMOTOCO)

हिन्दाल्को (HINDALCO)

रिलायन्स (RELIANCE)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

भारत फोर्ज (BHARATFORG)