Share Market: घसरणीला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 278 तर निफ्टीत 60 अंकाची तेजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

Share Market: घसरणीला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 278 तर निफ्टीत 60 अंकाची तेजी

मागील आठवड्यापासून शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. काल दिवसभरात शेअर बाजारात 900 अंकांची घसरण झाली होती. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजार सावरताना दिसत आहे. बाजाराची सुरवात होताच सेन्सेक्समध्ये 278 अंकांची तेजी दिसून आली तर, निफ्टीत 60 अंकाच्या तेजीसह व्यवहार करत आहे. तर सेन्सेक्समध्ये आज 0.18 टक्क्यांची तेजी होऊन तो 57,248 अंकांवर सुरू झाला तर निफ्टीमध्ये 0.22 टक्क्यांची तेजी होऊन तो 17,053 अंकांवर सुरू झाली आहे

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी इंडेक्स 17,016 च्या पातळीवर बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. सोमवारी विक्रीचा मोठा दबाव दिसला. आयटी वगळता सर्व सेक्टरल इंडेक्स लाल रंगात बंद झाले. ब्रॉडर इंडेक्सही कमजोरीसह व्यवहार करत होता. त्यातील प्रत्येक इंडेक्स 3% पेक्षा जास्त घसरला.

जागतिक आघाडीवर कोणताही दिलासा नसल्याचे अजित मिश्रा म्हणाले. याशिवाय, परकीय गुंतवणूकदारांनी पुन्हा विक्री सुरू केल्याने बाजारावर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. निफ्टीमध्ये 16,800-16,900 चा झोन दिसू शकतो. एफएमसीजी, फार्मा आणि आयटीमधील निवडक पॉकेट्स कमी परतावा दाखवत आहेत. तर बरेच सेक्टर्स दबावाखाली व्यवहार करताना दिसून आले.

हेही वाचा: बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

गेल्या काही आठवड्यांपासून निफ्टी शॉर्ट टर्म करेक्शन मोडमध्ये असल्याचे बीएनपी पारिबसचे गौरव रत्नपारखी म्हणाले. सोमवारी जागतिक संकेतांमुळे त्याचे ओपनिंग गॅप कमी झाले. निफ्टी 17166 च्या ऑगस्टच्या नीचांकी खाली घसरला. विक्रीच्या दबावामुळे तो 200 DMA च्या जवळ पोहोचला.

इंडेक्सला 16947-17018 या गॅप एरियातून सपोर्ट मिळाला असल्याचे गौरव म्हणाले. जुलैमध्ये डेली चार्टवर गॅप एरिया तयार झाला होता. इंडेक्सने त्या पातळीपासून इंट्राडेवर जाण्याचा प्रयत्न केला, पण कायमस्वरूपी रिकव्हर होऊ शकला नाही. हा अपट्रेंड येत्या काळात 17200 च्या पातळीवर अडकलेला दिसून येईल. दुसरीकडे, जर निफ्टीने गॅप एरिया तोडला तर तो 16800 पर्यंत घसरू शकतो.