
Share Market: सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला, निफ्टी 16300वर सुरु; M&M, टायटनचे शेअर्स वधारले
Share Market Latest Updates Today: शुक्रवारच्या दमदार कामगिरीनंतर आज सोमवारी शेअर बाजारानं सकारात्मक ओपनिंग दिलं. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक किरकोळ वाढीसह सुरु झाले. सेन्सेक्स 133.56 अंकांनी वधारून 54,459.95 वर सुरु झाला, तर निफ्टी 24.8 अंकांनी वधारून 16,290.95वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टायटन, आयशर मोटर्स, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्ससह 36 शेअर्सची सुरुवात वाढीसह झाली, तर HINDALCO, आयटीसी, कोल इंडिया, एचसीएल टेक, भारती एअरटेल, एचडीएफसी लाईफसह 14 शेअर्सची सुरुवात घसरणीने झाली.
हेही वाचा: येत्या आठवड्यात खुला होणार या केमिकल कंपनीचा IPO, जाणून घ्या अधिक माहिती...
दरम्यान शुक्रवारी भारतीय बाजारांनी जोरदार पुनरागमन केले. शेअर बाजाराला चांगले जागतिक संकेत आणि खरेदीचा पाठिंबा मिळाल्याने ही रिकव्हरी झाली. सेन्सेक्स 1534.16 अंकांच्या म्हणजेच 2.91 टक्क्यांच्या वाढीसह 54,326.39 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 456.75 अंकांच्या अर्थात 2.89 टक्क्यांच्या वाढीसह 16,266.15 वर बंद झाला.
बाजार शुक्रवारी आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. जागतिक बाजार विशेषत: आशियाई बाजारातील मजबूतीमुळे भारतीय बाजारांमध्येही उत्साह दिसून आला. चीनच्या सेंट्रल बँकेने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात केली असून, त्यामुळे इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्येही आशेचा किरण दिसून आला आहे. मात्र मंदी आणि व्याजदर वाढीची भीती अजूनही कायम आहे,
Web Title: Share Market Opening Updates Sensex And Nifty Status
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..