येत्या आठवड्यात खुला होणार या केमिकल कंपनीचा IPO, जाणून घ्या अधिक माहिती...| Aether Industries IPO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPO
येत्या आठवड्यात खुला होणार या केमिकल कंपनीचा IPO, जाणून घ्या अधिक माहिती...| Aether Industries IPO

येत्या आठवड्यात खुला होणार या केमिकल कंपनीचा IPO, जाणून घ्या अधिक माहिती...

स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनी एथर इंडस्ट्रीजचा (Aether Industries) आयपीओ (IPO) पुढील आठवड्यात 24 मे रोजी खुला होईल आणि 26 मे रोजी बंद होईल. दुसरीकडे, अँकर गुंतवणूकदारांसाठी, ही बोली एक दिवस आधी म्हणजेच 23 मे रोजी उघडेल. कंपनीने आपल्या IPO साठी 610 ते 642 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. मार्केट ऑब्झर्व्हरच्या मते, शुक्रवारी एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) 18-20 रुपये होता. कंपनीचे शेअर्स 3 जून रोजी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.

प्री-आयपीओ प्लेसमेंटनंतर कंपनीने आयपीओचा फ्रेश इश्यूची साईज 757 कोटी रुपयांवरून 627 कोटी रुपयांपर्यंत कमी केली. फ्रेश इश्यू व्यतिरिक्त, कंपनीचे प्रमोटर्स आणि भागधारक त्यांच्या शेअर्सचे 28.2 लाख शेअर्स विक्रीसाठी ठेवतील. कंपनी 642 रुपयांच्या वरच्या प्राइस बँडवर सुमारे 808 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.

हेही वाचा: म्युच्युअल फंडात 100 रुपयांसह सुरु करा गुंतवणूक, देईल चांगला परतावा...

आयपीओद्वारे उभारलेल्या पैशांपैकी 190 कोटी रुपये सुरतमध्ये कंपनीचे नवीन युनिट उभारण्यासाठी वापरले जातील, तर 138 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील. डिसेंबर 2021 पर्यंत कंपनीवर 234.73 कोटी रुपयांचे कर्ज होते. IPO च्या पैशांपैकी 165 कोटी रुपये कंपन वर्किंग कॅपिटलसाठी वापरतील. एचडीएफसी बँक लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

कंपनी काय करते ?
एथर इंडस्ट्रीजची (Aether Industries) स्थापना 2013 मध्ये झाली. ही कंपनी ऍडवान्स इंटरमीडिएट आणि स्पेशल केमिकल्स तयार करते. एथरचे गुजरातमध्ये दोन युनिट्स आहेत. कंपनीचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिट, ऍनालिटिलक सायन्स लॅबोरेटोरी पायलट प्लांट, CRAMS सुविधा आणि हायड्रोजनेशन युनिट यांचा समावेश असलेले 3,500 चौरस मीटरमध्ये पसरलेले एक युनिट आहे. कंपनीचे दुसरे युनिट, 10,500 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेले आहे. त्याची वार्षिक उत्पादन क्षमता 6,096 मेट्रिक टन आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Aether Industries Ipo Will Be Open Next Week On 24 May

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top