esakal | नफावसुलीने, तेजीनंतर, गडगडला शेअर बाजार
sakal

बोलून बातमी शोधा

sensex down

नफावसुलीमुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 413 अंशांच्या घसरणीसह  33 हजार 956 पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 120 अंशांची घसरण झाली. तो 10 हजार 46 पातळीवर स्थिरावला.अमेरिकी अर्थव्यवस्थेत महामंदीच्या वाटेवर असल्याची शक्यता "नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनॉमिक्स'ने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. परिणामी जागतिक पातळीवरून देखील नकारात्मक संकेत मिळत असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. 

नफावसुलीने, तेजीनंतर, गडगडला शेअर बाजार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भारतीय शेअर बाजारात मंगळवारी दिवसभर अस्थिरतेचे वातावरण होते. 
बँकिंग आणि कन्झ्युमर ड्युरेबल क्षेत्रात घसरण झाल्याने शेअर बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाला. नफावसुलीमुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 413 अंशांच्या घसरणीसह  33 हजार 956 पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 120 अंशांची घसरण झाली. तो 10 हजार 46 पातळीवर स्थिरावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुंतवणूकदारांनी गेल्या सत्रात खरेदी केलेल्या शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे शेअरची विक्री करून नफवसुली केल्याने मंगळवारी शेअर निर्देशांकात मोठी घसरण झाली.  

क्षेत्रीय पातळीवर बँक आणि ऑटो कंपन्यांचे शेअर वगळता मेटल, आयटी, सार्वजनिक कंपन्याच्या शेअरमध्ये खरेदीचा सपाटा सुरू होता. मात्र दुपारच्या सत्रात नफेखोरांनी विक्रीचा मारा सुरु केला.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. देशात "कम्युनिटी स्प्रेड' सुरू होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सोन्यातील गुंतवणूक, एक सोनेरी पर्याय

अमेरिकी अर्थव्यवस्थेत महामंदीच्या वाटेवर असल्याची शक्यता "नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनॉमिक्स'ने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. परिणामी जागतिक पातळीवरून देखील नकारात्मक संकेत मिळत असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. 

ऑटो क्षेत्रातील कंपन्यांना मंगळवारी मोठा फटका बसला. अशोक लेलँड, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, टीव्हीएस मोटर्स, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. सेन्सेक्सच्या मंचावर भेल, आरबीएल बँक, मुथूट फिन, गोदरेज प्रॉपर्टी यांचे शेअर सर्वाधिक तेजीत होते. तर व्होल्टास, बँक ऑफ इंडिया, हुडको आणि आयडीबीआयच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

रुपया घसरला
 
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी घसरला आणि 75.61 वर बंद झाला.