Share Market : 65 पैशांचा 'हा' शेअर पोहोचला 306 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा शेअर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : 65 पैशांचा 'हा' शेअर पोहोचला 306 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा शेअर?

Share Market : सायरस पूनावाला ग्रुपची नॉन-बँकिंग फायनांशियल कंपनी (NBFC) पूनावाला फिनकॉर्पच्या (Poonawala Fincorp) शेअर्समध्ये गेल्या काही काळापासून चांगली तेजी पाहायला मिळत आहे.

गेल्या पाच दिवसांत त्यात सुमारे 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. लाँग टर्ममध्ये गुंतवणूकदारांना या शेअर्सने कोट्यधीश बनवले आहे. यामध्ये आणखी तेजीचा अंदाज आहे. येत्या काळात पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्समध्ये आणखी तेजी येईल असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने यामध्ये गुंतवणुकीसाठी 350 रुपयांचे टारगेट दिले आहे. हे टारगेट सध्याच्या किंमतीपेक्षा 14 टक्क्यांनी जास्त आहे. गुरुवारी याचे शेअर्स 1.26 टक्क्यांच्या वाढीसह बीएसईवर 305.95 रुपयांवर बंद झाले.

पूनावाला फिनकॉर्पचे शेअर्स 20 फेब्रुवारी 2002 रोजी फक्त 65 पैशांना मिळत होता. आता तो 471 पटीने वाढून 305.95 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे त्यावेळी केवळ 22 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदार कोट्याधीश झाले. या शेअरने गुंतवणूकदारांना केवळ लाँग टर्मच नाही तर शॉर्ट टर्ममध्येही उत्कृष्ट परतावा दिला आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

मागील वर्षी 29 डिसेंबर 2021 रोजी तो 197.95 रुपयांवर होता, जो एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत तो 74 टक्क्यांनी वाढून 343.75 रुपयांवर पोहोचला. सध्या हा शेअर सुमारे 11 टक्क्यांच्या सवलतीवर मिळत आहे.

हेही वाचा: Sah Polymers IPO : वर्षातला शेवटचा आयपीओ खुला, जाणून घ्या अधिक

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.