
हे 10 शेअर्स देतील दरदार परतावा; जाणून घेऊया शेअर बाजाराचा मूड
Share Market: मंगळवारी ईदनिमित्त शेअर बाजार बंद होता, सोमवारी बाजारात थोडी रिकव्हरी दिसून आली. मेटल, बँकिंग, एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी झाली. सेन्सेक्स 85, निफ्टी 33 अंकांनी घसरला पण निफ्टी बँक 76 अंकांनी वधारला. सेन्सेक्स 85 अंकांनी घसरून 56,976 वर बंद झाला. निफ्टी 33 अंकांनी घसरून 17,069 वर बंद झाला निफ्टी बँक 76 अंकांनी वाढून 36,164 वर बंद झाला. मिडकॅप 177 अंकांनी घसरून 29,703 वर बंद झाला.
फेडच्या कठोर वृत्तीने बैठकीपूर्वीच गुंतवणूकदारांना सावध केल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. त्यामुळे बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. डॉलरच्या निर्देशांकात सातत्याने होणारी वाढ आणि वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ बाजारात नकारात्मक वातावरण आहे. दुसरीकडे, जीएसटी टॅक्स कलेक्शन, वाहन विक्रीचे आकडे आणि एप्रिलचे पीएमआय आकडे सुधारत्या इकोनॉमिक आउटलुकचे संकेत देत आहेत.
आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?-
कमकुवत जागतिक संकेत असतानाही बाजार तळापासून सावरल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. जे बुल्स सरेंडर करण्याच्या मनस्थितीत नसल्याचा संकेत आहे. आज होणाऱ्या फेड बैठकीनंतर जे चढ-उतार दिसतील तेव्हाच बाजाराची खरी परीक्षा असल्याचेही ते म्हणाले.
यूएस फेडच्या कठोर वृत्तीमुळे बाजारात अस्थिरता कायम राहील असे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. FII ची विक्री, वस्तूंच्या वाढत्या किमती, डॉलर-इंडेक्समधील मजबूती यांचा बाजारावर नकारात्मक परिणाम होत आहे. पण दुसरीकडे, जीएसटी संकलनातील वाढ, वाहन विक्रीचे चांगले आकडे आणि मजबूत मॅन्युफॅक्चरींग पीएमआयमधील मजबूती बाजारासाठी चांगले संकेत आहेत. ते पुढे म्हणाले की निफ्टीला पहिला सपोर्ट 16,700 वर आहे. त्याच वेळी, 17,200 वर रझिस्टंस दिसत आहे. बँक निफ्टीला 35,500 वर सपोर्ट तर 36,500 वर रझिस्टंस आहे.
आजचे परफॉर्म करु शकणारे टॉप 10 शेअर्स-
इंडसइंड बँक (INDUSINDBANK)
कोल इंडिया (COALINDIA)
पॉवरग्रीड (POWERGRID)
टाटा स्टील (TATASTEEL)
आयटीसी (ITC)
झी एन्टरटेन्मेंट (ZEEL)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
टाटा पॉवर (TATAPOWER)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.