बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Updates | Stock Market News

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुरुवारी भारतीय बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1416.30 अंकांनी अर्थात 2.61 टक्क्यांनी घसरून 52,792.23 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 430.90 अंकांनी म्हणजेच 2.65 टक्क्यांनी घसरून 15,809.40 वर बंद झाला. BSE सेन्सेक्स आणि निफ्टीने इंट्राडे मध्ये 52669.51 आणि 15775.20 च्या इंट्राडे नीचांकाला स्पर्श केला.

गुरुवारच्या घसरणीत एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 658257.76 कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएसईचे मार्केट कॅप 18 मे रोजी 25577445.81 कोटींवरून 24919188.05 कोटी रुपयांवर घसरले.

युएस रिटेल कंपन्यांच्या अलीकडील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की महागाईच्या उच्च दराचा कंपन्यांच्या व्यवसायावर खराब परिणाम होत आहे असे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील किरकोळ विक्रेते टार्गेट कॉर्पचे शेअर्स इंधन आणि मालवाहतुकीतील वाढीमुळे 26 टक्क्यांहून अधिक घसरले. आता अमेरिकेतील अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंता निर्माण झाली आहे. एका दिवसापूर्वी वॉलमार्ट इंकने त्याचे निकाल जाहीर केले होते. ज्यामध्ये त्याने आपल्या कमाईचा अंदाज कापला. वाढती महागाई, मंदीची भीती आणि यूएस फेडचे निर्णय कठोर होण्याची शक्यता ही काही कारणे जागतिक बाजारावर दबाव बनवत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी घसरणीसह उघडत आधीच्या स्विंग लोच्या दिशेने घसरल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टी 16000 च्या खाली घसरल्याने ट्रेंड नकारात्मक झाला आहे. आता पहिला सपोर्ट निफ्टीला 15671वर दिसत आहे. जर निफ्टीने ही पातळी तोडली तर तो 15400 पर्यंत येऊ शकतो. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 16000 वर रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एचसीएल टेक (HCLTECH)

विप्रो (WIPRO)

इन्फोसिस ( INFY)

टीसीएस (TCS)

टेक महिन्द्रा (TECHM)

एम फॅसिस (MPHASIS)

एल अँड टी (LTTS)

ऑरो फार्मा (AUROPHARMA)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Share Market Prediction Best Stock To Buy Today 20 May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top