esakal | बाजाराच्या घोडदौडीला ब्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

Share market

सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर दोन्ही निर्देशांकात मोठी वाढ होण्यास सुरूवात झाली मात्र नंतर नफावसूली सुरू झाल्यामुळे बाजाराच्या घोडदौडीला ब्रेक लागला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 30 अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 91 अंशांची वाढ  दिसून आली. सेन्सेक्स 34,378 अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी 10,172 अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

बाजाराच्या घोडदौडीला ब्रेक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

* सेन्सेक्स 34,378 अंशांच्या पातळीवर

* निफ्टी 10,172 अंशांच्या पातळीवर 

* निफ्टीमध्ये 30 अंशांची वाढ

* सेन्सेक्समध्ये 91 अंशांची वाढ

शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल सुरू आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात सुधारणा नोंदवण्यात आली आहे. सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर दोन्ही निर्देशांकात मोठी वाढ होण्यास सुरूवात झाली मात्र नंतर नफावसूली सुरू झाल्यामुळे बाजाराच्या घोडदौडीला ब्रेक लागला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 30 अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 91 अंशांची वाढ  दिसून आली. सेन्सेक्स 34,378 अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी 10,172 अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल, इंडसइंड बॅंक, बीपीसीएल, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे.

 तर महिंद्रा अँड महिंद्रा, श्री सिमेंट, सिप्ला या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे.

निफ्टी बॅंक, निफ्टी आयटीसह इतरही निर्देशांक सकारात्मकरित्या वाढ नोंदवत आहेत. 

आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या​
कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही तेजी नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल 3017 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र थोडी सुधारणा झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 0.042 रुपयांनी वधारला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया 75.54 रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.