esakal | शेअर बाजारामध्ये उसळी, सेन्सेक्सने ओलांडली ३२,०००ची पातळी 
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

शेअर बाजाराने तेजी कायम राखली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५०अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ५३० अंशांची उसळी सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३२,१४० अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.

शेअर बाजारामध्ये उसळी, सेन्सेक्सने ओलांडली ३२,०००ची पातळी 

sakal_logo
By
पीटीआय

शेअर बाजाराने तेजी कायम राखली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५०अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ५३० अंशांची उसळी सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३२,१४० अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,४६४ अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे. निफ्टी सध्या ९,००० ते ९,५०० अंशांच्या पातळीवर स्थिरावताना दिसतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निफ्टी बॅंक निर्देशांकातदेखील २.१३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

बॅंक निफ्टीमध्ये आज चांगलीच तेजी दिसून येते आहे. निफ्टी बॅंक निर्देशांकातदेखील २.१३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. बॅंक निफ्टीने ४०० अंशांची उसळी घेतली आहे. निफ्टी मिडकॅप निर्देशांकात १.३ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात १.७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

श्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...

बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये तेजी नोंदवण्यात आली. या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय धातू, मिडिया, 
रिअॅल्टी या क्षेत्रातील कंपन्यांच्या किंमतीत तेजी नोंदवण्यात आली आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल 2,403 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

आरबीआय बाॅंड्समध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी...

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र थोडी सुधारणा झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ०.०२5 रुपयांनी वधारला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.74 रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

सन फार्माचा नफा ४१ टक्क्यांनी वाढून ३,७६५ कोटींवर; कंपनीच्या विक्रीत १३ टक्क्यांची वाढ

* सेन्सेक्स ३२,१४० अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,४६४ अंशांच्या पातळीवर 
* निफ्टीमध्ये १५० अंशांची उसळी
* सेन्सेक्समध्ये ५३० अंशांची उसळी