सन फार्माचा नफा ४१ टक्क्यांनी वाढून ३,७६५ कोटींवर; कंपनीच्या विक्रीत १३ टक्क्यांची वाढ

Sun-Pharma
Sun-Pharma

देशातील आघाडीची औषध निर्मिती कंपनी असलेल्या सन फार्माला ३१ मार्च अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात ३,७६४.९३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. सन फार्माच्या नफ्यात ४१.२५ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात (२०१८-१९) कंपनीने २,६६५.४२ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली होती. कंपनीच्या महसूलात १३ टक्क्यांची वाढ होत तो २८,६८६ कोटी रुपयांवरून ३२,३२५ कोटी रुपयांवर पोचला आहे.

मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत सन फार्माला ३९९.८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता कंपनीच्या नफ्यात टक्क्यांची घट झाली आहे. मात्र चौथ्या तिमाहीत कंपनीच्या महसूलात १४.३ टक्क्यांची वाढ होत तो ८,१८४.९ कोटी रुपयांवर पोचला आहे. कंपनीच्या मार्जिनमध्येही २५० बेसिस पॉईंट्सची वाढ होत ते १६.७ टक्क्यांवर पोचले आहे.

२०१९-२०  या आर्थिक वर्षात कंपनीची भारतातील विक्री ९,७१० कोटी रुपये इतका होती. एकूण महसूलाच्या ३० टक्के इतके हे प्रमाण आहे. तर अमेरिकेतील औषधांच्या विक्रीत २ टक्क्यांची घट होत ती १४८.७ कोटी डॉलर इतकी झाली आहे. उद्योन्मुख बाजारपेठेतील विक्री १ टक्क्यांनी वाढून ७७.६ कोटी डॉलरवर पोचली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

'आमची व्यावसायिक कामगिरी उत्तम झाली आहे. भारतीय बाजारपेठेतील आमचा हिस्सा वाढतो आहे. जागतिक बाजारपेठेतील आमचा व्यवसायदेखील वाढला आहे. कोविड-१९मुळे अनिश्चितता निर्माण झालेली असतानादेखील आमच्या प्रत्येक व्यवसायात चांगली कामगिरी करत बाजारपेठेतील आमचा हिस्सा वाढवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे', असे मत सन फार्माचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप संघवी यांनी व्यक्त केले आहे. 

सन फार्माच्या संचालक मंडळाने १ रुपया प्रति शेअरच्या लाभांशाची शिफारस केली आहे. कंपनीच्या सर्वसाधारण सभेत यासाठीची मंजूरी घेतली जाणार आहे.
सप्टेंबर २०२० मध्ये हा लाभांश दिला जाण्याची शक्यता आहे. सन फार्माची उपकंपनी असलेल्या टारो फार्मास्युटीकल्सच्या नफ्यात ७.२ टक्क्यांची घट होत तो ५.४२ कोटी डॉलरवर आला आहे. टारो फार्मास्युटीकल्सच्या विक्रीत चौथ्या तिमाहीत ५० लाख डॉलरची घट होत ती १७.४९ कोटी डॉलरवर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com