Share Market
Share MarketSakal

शेअर बाजाराची ओपनिंग ५०० अंकांच्या घसरणीने

HDFC च्या शेअर्सला फटका
Published on

मुंबई: मुंबई शेअर बाजारात (share market) आज मोठी पडझड दिसून आली. सकाळी बाजार उघडल्यानंतर पहिल्या सत्राच्या व्यवहारातच निर्देशांक (sensex) ५०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही (nifty) घसरण झाली. (share market sensex fall 500 points)

निफ्टी १५,८०० च्या खाली आला. जागतिक शेअर बाजारातील घडामोडींचे परिणाम मुंबई शेअर बाजारात दिसून आले. NTPC, HCL टेक्नोलॉजीस, टायटन आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये बढत दिसून आली.

Share Market
'सामना'मध्ये हेडलाईन येईल "आमचीच लाल आमचीच लाल"; मनसेचा टोला

दुसऱ्या बाजूला HDFC बँक, एचडीएफसीच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. आयसीआयसीआय, इंडसइंड, एक्सिस, एसबीआय या बँकांच्या शेअर्समध्येही घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com