बाजारासाठी व्याजदर कपात प्रभावहीन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली आहे. यामुळे व्याजदराशी संबंधित शेअरची मागणी वाढली. मात्र बॅंकिंग शेअर्सवर दबाव दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर टीसीएसमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

मुंबई - मॉन्सूनबाबतची अनिश्‍चितता आणि विकासदरासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेसह इतर संस्थांच्या अंदाजांनी चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना पतधोरणातील व्याजदर कपात खूश करण्यास अपयशी ठरली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १९२.४० अंशांच्या घसरणीसह ३८ हजार ६८४.७२ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४५.९५ अंशांची घट झाली आणि तो ११ हजार ५९८ अंशांवर स्थिरावला. 

रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली आहे. यामुळे व्याजदराशी संबंधित शेअरची मागणी वाढली. मात्र बॅंकिंग शेअर्सवर दबाव दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर टीसीएसमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

त्याखालोखाल एचसीएल टेक, येस बॅंक, इंड्‌सइंड बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, टाटा स्टील, इन्फोसिस आदी शेअर घसरणीसह बंद झाले. त्याचबरोबर टाटा मोटर्स, हिरो मोटो कॉर्प, भारती एअरटेल, एशियन पेंट, वेदांता आणि सन फार्मा आदी शेअरमध्ये वाढ झाली. आयटी आणि एनर्जी निर्देशांकात घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये पडझड दिसून आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market Sensex Interest rate