शेअर बाजारात तेजीचे वारे; सेन्सेक्स, निफ्टीची घोडदौड 

वृत्तसंस्था
Thursday, 28 May 2020

शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गुरुवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५९५अंशांनी वधारून ३२ हजार २०० पातळीवर बंद झाला.निफ्टी ९ हजार ४९० अंशांवर बंद झाला.

मुंबई - जागतिक पातळीवरून मिळणारे सकारात्मक संकेत आणि मॉन्सूनची सकारात्मक  बातमीमुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गुरुवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५९५अंशांनी वधारून  ३२ हजार २०० पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये १७५ अंशांची वाढ झाली. निफ्टी ९ हजार ४९० अंशांवर बंद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळपासूनच बाजारात तेजीचे वातावरण होते. आज बँकांचे शेअर सर्वाधिक वधारले होते. कोरोना संकटातून सावरत जागतिक अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. चीन, जपान या देशांच्या केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्थेसाठी मोठे पॅकेज जाहीर केले आहेत. आता युरोपातील केंद्रीय बँकांकडून देखील पॅकेज दिले जाण्याच्या शक्यतेने जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण होते. अमेरिका आणि इतर प्रमुख युरोपीयन शेअर बाजारात देखील तेजी दिसून आली. 

श्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...

आशियाई बाजारात देखील तेजीचे वातावरण होते. ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील शेअर बाजार वधारले. सिंगापूर एसजीएक्स निफ्टीमध्ये वाढ झाली. त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर उमटले क्षेत्रीय पातळीवर बँका, वित्त संस्था, सिमेंट, फार्मा, मेटल सर्वाधिक वधारले.  

सेन्सेक्सच्या मंचावर एचडीएफसी बँक, एचडीएफसी, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, ऍक्सिस बँक, एलअँडटी , इंडसइंड बँक, मारुती, एशियन पेंट्स या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले होते. वाहन उद्योगातील आयशर मोटर, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, कमिन्स, बॉश्च, अशोक लेलँड आदी शेअर तेजीत होते.

आरबीआय बाॅंड्समध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी...

विकासदर उणे ५ होणार
 एसअँडपी या जागतिक मानांकन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू वर्षाचा विकासदर उणे ५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाचे परिणाम दीर्घकाळ जाणवतील, असे या संस्थेने म्हटले आहे. 

रुपया वधारला
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ४ पैशांनी वधारला असून तो ७५.७७ रुपये प्रति डॉलरवर पोचला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market : Sensex surges over 500 points Investors in the stock market