टेक्सटाईल शेअरची छप्परफाड कमाई! वर्षभरात दुपटीवर जाणार, तज्ज्ञांना विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

कंपनीची शानदार कमाई आणि जोरदार मागणीमुळे गेल्या काही तिमाहीत या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

टेक्सटाईल शेअरची छप्परफाड कमाई! वर्षभरात दुपटीवर जाणार

sakal_logo
By
शिल्पा गुजर

नितीन स्पिनर्सने (Nitin Spinners) गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना 460 टक्के परतावा दिला असून यावर्षी आतापर्यंत नितीन स्पिनर्सचे शेअर्स 263 टक्क्यांनी वाढले आहेत. या मल्टी बॅगर स्टॉकमधील (Multi bagger Stock) तेजी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे असा तज्ज्ञांना विश्वास आहे. येत्या वर्षभरात नितीन स्पिनर्सचे शेअर्स दुप्पट पैसे मिळवतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या स्टॉकमध्ये एका वर्षात जवळजवळ दुप्पट होण्याची क्षमता असल्याचे चॉइस ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (रिसर्च) कुणाल पारर म्हणाले.

हेही वाचा: टाटा स्टीलच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांची दिवाळी! वर्षभरात पैसे डबल

Share Market

Share Market

तांत्रिक बाजू

नितीन स्पिनर्सच्या शेअर्सना 295 च्या उच्चांकाजवळ मोठ्या प्रतिकाराचा सामना करावा लागत असल्याचे मोनार्क नेटवर्थ कॅपिटलचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक अर्पन शाह म्हणाले. इथे विक्रीच्या प्रचंड दबावाचा सामना करूनही स्टॉकमध्ये खूप कमी विक्री झाली आहे, ज्यामुळे हा स्टॉकमध्ये पुढे आणखी कमाई करुन देऊ शकतो असेही शाह म्हणाले.

सध्याची गती पाहता या शेअर्समध्ये थोडी घसरण दिसू शकते. यामुळे 230-240 च्या दरम्यान हे शेअर्स खरेदी करण्याची चांगली संधी मिळेल असेही शाह म्हणाले, तर यासाठी 300-350 रुपयांचे टारगेट त्यांनी निश्चित केले आहे. नितीन स्पिनर्सचे शेअर्स उच्चांकाच्या पुढे गेले की ते 400-500 रुपयांपर्यंत सहज जाऊ शकतील असे मत कुणाल पारर यांनी मांडले आहे. कंपनीची शानदार कमाई आणि जोरदार मागणीमुळे गेल्या काही तिमाहीत या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

हेही वाचा: Share Market : शेअर बाजारावर मंदिचे सावट!

Share Market

Share Market

नितीन स्पिनर्सची आर्थिक बाजू

नुकत्याच पार पडलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत राजस्थानस्थित नितीन स्पिनर्सचा निव्वळ नफा दुपटीने वाढून 87.4 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 42.9 कोटी रुपये होता. या वर्षीच्या जानेवारी-मार्च तिमाहीत नितीन स्पिनर्सचा महसूल 511.6 कोटी रुपये होता, जो सप्टेंबर तिमाहीत 664.7 कोटी रुपयांवर पोहोचला. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या विक्रीतही तिमाही आधारावर 20 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवली गेली.

हेही वाचा: Veranda Learning कडून 200 कोटींच्या IPO साठी सेबीकडे कागदपत्रे सादर

Share Market

Share Market

तज्ज्ञांचे मत

नितीन स्पिनर्स येत्या क्वार्टर्समध्ये चांगली कामगिरी करेल असा विश्वास टर्टल वेल्थचे मुख्य कार्यकारी रोहन मेहता यांनी व्यक्त केला. एखाद्याला वस्त्रोद्योग क्षेत्रात (Textile sector) गुंतवणूक करायची असेल, तर त्यांनी हा मल्टीबॅगर स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करावा असे मत मेहता यांनी नोंदवले आहे. शुक्रवारी एनएसईवर नितीन स्पिनर्सचे शेअर्स 2.90 टक्क्यांनी घसरून 252.80 रुपयांवर बंद झाले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top