Share Market Updates| शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण!

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी घसरण दिसून आली.
Share Market News Updates
Share Market News Updatesesakal
Updated on
Summary

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी घसरण दिसून आली.

भारतीय शेअर बाजारात (Share Market) शुक्रवारी घसरण दिसून आली. बीएसई सेन्सेक्स (Sensex) 143.20 अंकांच्या अर्थात 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह 58,644.82 वर बंद झाला. निफ्टी (Nifty) 43.90 अंकांनी अर्थात 0.25 टक्क्यांनी घसरून 17,516.30 वर बंद झाला.

शुक्रवारी बाजाराची सुरुवात वाढीसह झाली होती, पण काही काळानंतर ट्रेंड नकारात्मक झाला आणि सेन्सेक्स निफ्टी लाल चिन्हावर घसरला. दिवसभर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली आणि निर्देशांक त्यांच्या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हल वाचवताना दिसले. (Share Market News Updates)

Share Market News Updates
5 वर्षात दिला 500 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का 'हे' शेअर्स?

एफएमसीजी आणि मेटल वगळता सगळ्याच सेक्टर्समध्ये विक्री दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. युरोपीय बाजारातही कमजोरी कायम आहे. गुरुवारच्या धोरण बैठकीत बँक ऑफ इंग्लंडने पुन्हा दर वाढवले ​​आहेत, तर ईसीबीने पुन्हा एकदा वाढत्या महागाईच्या धोक्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे भविष्यात दर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय फेसबुकच्या मूळ मेटामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे अमेरिकन बाजारही दबावाखाली राहिल्याचे ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या तेजीनंतर शुक्रवारी गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक केल्याचे दिसून आला आणि त्यामुळे शेअर बाजारात घसरण झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले यांचे म्हणणे आहे. बहुतेक आशियाई बाजार तेजीत राहिले पण युरोपीय बाजारांनी सुरुवातीच्या व्यापारात संघर्ष केला, ज्यामुळे भारतीय बाजारावर परिणाम झाला.

Share Market News Updates
Tata Group चे हे दोन शेअर्स देतील भरपूर नफा

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टी 50 दिवसांच्या SMA च्या वर व्यवहार करताना दिसला, पण 17800 वर असलेल्या 20 दिवसांच्या DMA जवळ प्रॉफिट-बुकिंग दिसून आली. 50-दिवस SMA वर राहणे हे निफ्टीसाठी चांगले संकेत आहे. निफ्टीने विकली चार्टवर अप्पर शॅडो बुलिश कँडल तयार केली आहे. निफ्टीने डेली आणि इंट्राडे चार्टवर हायर बॉटम फॉर्मेशन सुरू ठेवले आहे, जे अपट्रेंड चालू असल्याचे दाखवते. 17400-17350 पातळी ही व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची सपोर्ट लेव्हल आहे. याच्या वर गेल्यावर निफ्टी 17,700-17850 च्या दिशेने जाऊ शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 17350 च्या खाली घसरला तर त्यात 17200-17150 पर्यंत घसरण पाहू शकतो असे ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स ? (Top 10 Shares to Watch)

- हिंदाल्को (HINDALCO)

- ओएनजीसी (ONGC)

- सनफार्मा (SUNPHARMA)

- एशियन पेन्ट्स (ASIANPAINTS)

- डिवीस लॅबोरेटरी (DIVISLAB)

- व्होल्टास (VOLTAS)

- टाटा पॉवर (TATAPOWER)

- रामको सिमेंट (RAMCOCEM)

- गुजरात गॅस लिमिटेड (GUJGASLTD)

- गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com