Share Market | बुधवारी शेअर बाजारात घसरण! आज कोणत्या शेअर्सवर लक्षकेंद्रित कराल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

बुधवारी पुन्हा सेन्सेक्स निफ्टी अर्ध्या टक्क्यांहून अधिक अंकांनी घसरून बंद झाले.

बुधवारी शेअर बाजारात घसरण! आज कोणत्या शेअर्सवर लक्षकेंद्रित कराल?

sakal_logo
By
शिल्पा गुजर

शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही घसरण दिसून आली. बुधवारी पुन्हा सेन्सेक्स निफ्टी अर्ध्या टक्क्यांहून अधिक अंकांनी घसरून बंद झाले. निफ्टी बँक आणि मिडकॅप निर्देशांकातही हीच स्थिती होती. सेन्सेक्स 314 अंकांनी घसरून 60,008 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 101 अंकांनी घसरून 17,899 वर बंद झाला. निफ्टी बँक 266 अंकांनी घसरून 38,041 वर बंद झाला. मिडकॅप 214 अंकांनी घसरून 31,729 वर बंद झाला.

बुधवारी सेन्सेक्समधील 30 पैकी 19 शेअर्स घसरले. त्याचवेळी निफ्टीच्या 50 पैकी 35 शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 9 शेअर्सची विक्री झाली. दुसरीकडे, डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी मजबूत होऊन 74.27 वर बंद झाला.

हेही वाचा: Mutual Funds मध्ये कोणते शेअर्स खरेदी करणं ठरेल फायद्याचं

Share Market

Share Market

अमेरिकेचे मजबूत रिटेल विक्रीच्या आकड्यामुळेही जागतिक बाजारपेठेवर काही परिणाम झाला नसल्याचे असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे (Geojit Financial Services) विनोद नायर म्हणाले. बुधवारी देशांतर्गत निर्देशांकही निगेटिव्ह ट्रेंडसह व्यवहार करताना दिसून आले आणि शेवटी लाल मार्कवर अर्थात घसरणीसह बंद झाले. इंग्लंडमधील वाढत्या महागाईने गुंतवणूकदार निराश झाले.

अमेरिकेतील किरकोळ विक्री ऑक्टोबरमध्ये 1.7 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, जी अपेक्षेपेक्षा जास्त आहे असेही नायर म्हणाले. पण कोविड-19 च्या नवीन केसेसमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंदीची भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Mudra loan | महिला सक्षमीकरणासाठी मुद्रा लोन!

Share Market

Share Market

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

निफ्टी 17900 च्या वाढत्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट तोडताना दिसला. याचा अर्थ निफ्टी 17,800-17,700 च्या दिशेने गेला तर त्यात आणखी कमजोरी येऊ शकते असे LKP सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे म्हणाले. निफ्टीसाठी 17950-18000 वर रेझिस्टन्स दिसत आहे. पुढील तेजीसाठी निफ्टीला 18000 च्या वर राहावे लागेल असेही ते म्हणाले.

हेही वाचा: शेअर बाजारात अस्थिरता, आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

Share Market

Share Market

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

- मारुती (MARUTI)

- एसबीआय लाईफ (SBILIFE)

- टाटा मोटर्स (TATAMOTORS)

- एनटीपीसी ( NTPC)

- एल. एंड टी. टेक्नोलॉजी सर्व्हीसेस लिमिटेड (LTTS)

- आरती इंडस्ट्रीज (AARTIIND)

- टाटा पॉवर (TATA POWER)

- एनआयआयटी टेक्नोलॉजीज (COFORGE)

- एमआरएफ (MRF)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top