Share Market | शेअर बाजारात अस्थिरता, आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

प्रॉफिट बुकींगमुळे शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.

शेअर बाजारात अस्थिरता, आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

मंगळवारी अस्थिरतेच्या दरम्यान भारतीय बाजार लाल मार्कसह अर्थात घसरणीसह बंद झाले. बँकिंग, मेटल, फार्मा आणि ऑइल अँड गॅस शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर आयटी, ऑटो सेक्टरमुळे थोडा सपोर्ट मिळाला.

मंगळवारी सेन्सेक्स 396.34 अंकांनी म्हणजेच 0.65 टक्क्यांच्या घसरणीसह 60,322.37 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 110.25 अंकांनी म्हणजेच 0.61 टक्क्यांनी घसरून 17,999.20 वर बंद झाला. मंगळवारी बाजाराची सुरुवात चांगली झाली नाही. दुपारच्या सत्रात त्यात थोडी रिकव्हरी दिसून आली पण लवकरच नफावसुलीने अर्थात प्रॉफिट बुकींगमुळे शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.

हेही वाचा: एस्ट्रल लिमिटेडच्या शेअर्स मध्ये एका वर्षात 135 टक्क्यांची वाढ

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने मंगळवारी डेली चार्टवर बियरिश कँडल तयार केली, जी घसरण दर्शवते असे मोतीलाल ओसवालाचे चंदन तापडिया म्हणाले. आता निफ्टीला 18, 200 आणि 18, 350 च्या झोनमध्ये जाण्यासाठी 18, 000 च्या वर रहावे लागेल. खाली 17, 900-17, 777 च्या पातळीवर सपोर्ट दिसत आहे.

कमजोर जागतिक संकेतांमुळे बाजार चिंतेत आहे आणि नजीकच्या भविष्यातही हा कल कायम राहील असे रेलिगेअर ब्रोकिंगचे (Religare Broking) अजित मिश्रा म्हणाले. जर वेगवेगळ्या क्षेत्रांचा विचार केला तर, बँकिंग क्षेत्रातील सततच्या कमकुवतपणामुळे सेन्सेक्स निफ्टीवर दबाव येतो आहे, तर इतर सेक्टर्स जास्तीच्या तोट्यापासून बाजाराचे संरक्षण करताना दिसता आहेत. सध्याच्या परिस्थितीत बाजाराची दिशा स्पष्ट होण्याची प्रतीक्षा करणे चांगले होईल असे अजित मिश्रा म्हणाले.

हेही वाचा: 'हे' 6 मिडकॅप्स शेअर्स देतील भरघोस परतावा, तुमच्याकडे आहेत का?

तांत्रिकदृष्ट्या निर्देशांकाने डेली टाईम फ्रेमवर एक बियरिश कँडल तयार केली आहे, जी निफ्टीमध्ये कमजोरी दाखवत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे (Choice Broking) पलक कोठारी म्हणाले. अव्हर्ली चार्टवर, निफ्टी लोअर हाय, लोअर लोजसोबत ट्रेड करत आहे. जे येत्या सत्रात आणखी काही सुधारणा दाखवत असल्याचेही ते म्हणाले. निफ्टी मंगळवारी 21-DMA खाली बंद झाला. स्टॉकॅस्टिक इंडिकेटर देखील नेगेटिव्ह क्रॉसओवर दाखवत आहे. जे येत्या ट्रेडिंग सत्रात बाजारातील कमजोरीचे लक्षण आहे. निफ्टीला 17800 स्तरावर सपोर्ट आहे तर 18250 स्तरावर रझिस्टंस दिसत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले.

हेही वाचा: Share Market : 'हे' 2 शेअर्स देऊ शकतील कमी वेळेत जास्त परतावा

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- मारुती (MARUTI)

- महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)

- टाटा मोटर्स ( TATA MOTORS)

- हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

- टेक महिंद्रा ( TECHM)

- एनआयआयटी टेक्नोलॉजीज (COFORGE)

- ट्रेंट (TRENT)

- भारत फोर्ज ( BHARATFORG)

- ए यू बँक (AUBANK)

- आयआरसीटीसी (IRCTC)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

loading image
go to top