Share Market : 'या' शेअर्ससोबत साजरी करा तगड्या परताव्याची दिवाळी

गुंतवणूकीबाबत बोलणं होते तेव्हा इक्विटी हा एक चांगला पर्याय समोर येतो.
share market
share marketsakal media
Summary

गुंतवणूकीबाबत बोलणं होते तेव्हा इक्विटी हा एक चांगला पर्याय समोर येतो.

दिवाळीला लक्ष्मी घरी येते, असे म्हटले जाते, म्हणूनच दिवाळीला शुभ गुंतवणुकीची परंपरा आहे. गुंतवणूकीबाबत बोलणं होते तेव्हा इक्विटी हा एक चांगला पर्याय समोर येतो. बाजारात असे अनेक शेअर्स आहेत जे तुमची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी करु शकतात. दिग्गजांकडून जाणून घेऊयात कोणते आहेत हे शेअर्स...

एमओएफएसएलचे (MOFSL) हेमांग जानी

युनायटेड स्पिरिट्सचे (UNITED SPIRITS) शेअर्स घेण्याचा सल्ला हेमांग जानी यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी 1005 रुपयांचे टारगेट दिले आहे, दिवाळीत कंपनीची विक्री वाढण्याची शक्यता आहे. लिकरच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये चांगली वाढ झाली आहे. हे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये ठेवल्यास चांगला नफा मिळेल असेही ते म्हणाले.

share market
शेअर बाजारात आज अस्थिरता अपेक्षित, तज्ज्ञांचे मत

जिओजित फायनान्शियलचे (Geojit Financial) गौरंग शाह

गौरंग शहांनी रिलायन्स इंडमध्ये (RELIANCE IND) गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीपर्यंत हे शेअर्स 3000 रुपयांची पातळी गाठू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कंपनीने नुकतेच स्वच्छ, हरित ऊर्जेत (clean, green energy) पाऊल टाकले आहे. त्यांचे तेल-वायू, डिजिटल, रिटेल, टेलिकॉम व्यवसाय उत्कृष्ट आहे. शिवाय, नवीन व्यवसायाचा परिणाम कंपनीच्या बॅलेन्सशीटवर दिसून येईल असेही शाह म्हणाले.

एयूएम कॅपिटलचे (AUM Capital) राजेश अग्रवाल

राजेश अग्रवाल यांनी ग्रासिममध्ये (GRASIM) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत हे स्टॉक्स 2100 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. कंपनीच्या व्यवसायात चांगली वाढ झाली आहे. त्यांची उपकंपनी अल्ट्राटेकमध्येही चांगली वाढ होते आहे. रंगव्यवसायात येणेही फायदेशीर ठरले आहे.

share market
Nazara Technologiesने विकत घेतली रस्क मीडियाची भागीदारी

बाजार तज्ज्ञ सुदीप बंदोपाध्याय

सुदीप बंदोपाध्याय यांनी एनटीपीसीमध्ये (NTPC) गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत हे शेअर्स 200 रुपयांपर्यंत जातील असा विश्वास असल्याचे बंदोपाध्याय म्हणाले. सरकारी कंपन्या पुढे आणखी चांगली कामगिरी करतील. कंपनीचे मूल्यांकन (Valuation) अतिशय स्वस्त आहे. ही देशातील सर्वोच्च वीज निर्मिती कंपनी आहे. कंपनी क्लीन एनर्जीमध्ये उतरली आहे. FY32 पर्यंत 60 जीबी वीज निर्मिती करण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे.

अरिहंत कॅपिटलचे (Arihant Capital) आशिष माहेश्वरी

आशिष माहेश्वरी यांनी भारती एअरटेलमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. पुढच्या दिवाळीपर्यंत हे स्टॉक्स 1000 रुपयांपेक्षा जास्त पातळी गाठतील. राइट्स इश्यूनंतर भांडवलात (Capital) वाढ होईल. त्याच वेळी 4 वर्षांचे मोरेटोरियम मिळाल्यामुळे रोख वाढेल. दूरसंचार क्षेत्राचा बाजार हिस्सा 30 टक्के आहे. कंपनी यावर्षी जोरदार नफा दाखवेल असा विश्वास माहेश्वरींनी व्यक्त केला.

share market
अवघ्या 18 महिन्यांत या स्टॉकने केले लाखाचे 12 लाख, आणखी तेजी येईल?

ट्राकॉम स्टॉक ब्रोकर्सचे (Tracom Stock Brokers) पृथ्वी शहा

पृथ्वी शहा यांनी एनओसीआयएलमध्ये (NOCIL) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत स्टॉकमध्ये 340 रुपयांची पातळी दिसू शकते. कंपनीची क्षमता दुप्पट झाली आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत या क्षमतेचा विस्तार केला जाईल. जागतिक कंपन्या या कंपनीला ऑर्डर देत आहेत ज्याचा कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीवर परिणाम होईल अशी माहिती शहा यांनी दिली.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com