Share Market : 'या' सरकारी कंपनीच्या शेअरने 11 महिन्यात गुंतवणुकदारांची संपत्ती केली दुप्पट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market update

Share Market : 'या' सरकारी कंपनीच्या शेअरने 11 महिन्यात गुंतवणुकदारांची संपत्ती केली दुप्पट

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (Hindustan Aeronautics Ltd) शेअर्स दरदिवशी नवा उच्चांक प्रस्थापित करत आहे. नुकताच मंगळवारी हे शेअर्स एनएसईवर 2.8 टक्क्यांनी वाढच 2,737 रुपयांवर पोहोचले. यासह, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे शेअर्स आता अशा शेअर्सच्या यादीत सामील झाले आहेत ज्यांनी या वर्षी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर म्हणजेच 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

2022 च्या सुरुवातीला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे शेअर्स एनएसईवर 1,233 रुपयांवर होते, जे आता वाढून 2,722.60 रुपये झाले आहे. अशा प्रकारे 2022 मध्ये हे शेअर्स आतापर्यंत जवळपास 120 टक्के वाढले आहेत. एखाद्या गुंतवणूकदाराने 2022 च्या सुरुवातीला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज हे 1 लाख रुपये दुप्पट अर्थात 2.20 लाख रुपये झाले असते.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला भारतीय तटरक्षक दलाकडून नऊ ऍडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (ALH) Mk-III साठी लेटर ऑफ इंटेंट (LoI) प्राप्त झाल्याचे कंपनीने नोव्हेंबरच्या सुरुवातीला सांगितले होते. त्यामुळेच गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 12.74% वाढ झाली आहे. अशात ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्टने या शेअर्सवर बाय रेटिंग देत 3,300 रुपयांचे टारगेट दिले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 21% जास्त आहे. त्याच वेळी, ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यासाठी 3170 रुपयांच्या टारगेटसग बाय रेटींग दिले आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा निव्वळ नफा सप्टेंबरच्या तिमाहीत 44.22% वाढून 1,221.23 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 846.76 कोटी होता. त्याच वेळी, सप्टेंबर तिमाहीत कंपनीची विक्री 7.34% ने वाढून 5,144.79 कोटी झाली जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 5,552.14 कोटी होती.

हेही वाचा: Share Market : गुंतवणूकदारांना स्टॉक स्प्लिटचे गिफ्ट; केवळ 4 वर्षांत मिळणार 'एवढे' टक्के रिटर्न

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.