Share Market Updates | आज कोणते शेअर करतील मालामाल? या 10 शेअर्सवर ठेवा लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market updates today, Stock Market news, Stock market updates, Nifty Today, best stock to buy today
Share Market: आज कोणते शेअर करतील मालामाल? या 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market: आज कोणते शेअर करतील मालामाल? या 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market : मंगळवारी बाजारात नफा-वसुली (Profit Booking) दिसून आले. आर्थिक शेअर्स विशेषत: एचडीएफसी ट्विन्समध्ये (HDFC twins) सर्वाधिक विक्री दिसून आली. दुसरीकडे ऑटो, पॉवर आणि एफएमसीजीमध्ये खरेदी दिसून आली. सेन्सेक्स 435.24 अंकांनी म्हणजेच 0.72 टक्क्यांनी घसरून 60,176.50 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 96.00 अंकांनी अर्थात 0.53 टक्क्यांनी घसरून 19957.80 वर बंद झाला. (Share Market updates today)

हेही वाचा: Share market: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 360 तर निफ्टी 115 अंकांनी घसरला

आज शेअर बाजाराची स्थिती कशी असेल?

चांगल्या ओपनिंगनंतर निफ्टी दिवसभर नकारात्मक ट्रेंडसह व्यवहार करत राहिला आणि वरच्या स्तरावरून नफा-वसुली दिसून आल्याचे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले. शेवटी निफ्टी 0.53 टक्क्यांनी घसरून 19957.80 च्या पातळीवर बंद झाला, तर बँक निफ्टी 1.47 टक्क्यांनी घसरून 38,067.90 वर बंद झाला. तांत्रिक दृष्टीकोनातून विचार केल्यास, निफ्टीला 18100 पातळीपासून रझिस्टंसचा सामना करावा लागला. पण तो त्याच्या 50 दिवसांच्या SMA वर बंद करण्यात यशस्वी झाला.

निफ्टीने मागील हॉरिजेंटल लाइनचा सपोर्ट घेतला आणि त्याच्या वर बंद झाला. खरेदीदार बाजारात सक्रिय असल्याचे हे संकेत आहेत. दुसरीकडे, मोमेंटम इंडिकेटर MACD देखील डेली चार्टवर सकारात्मक क्रॉसओव्हरसह व्यापार करताना दिसले जे तेजीचे चिन्ह आहे.

निफ्टी 21- आणि 50-HMA च्या वर बंद करण्यात यशस्वी झाला आहे, जर तो या पातळीच्या वर राहिला तर तो आणखी वाढू शकतो. निफ्टीला 17,800 वर सपोर्ट दिसतो तर पहिला रझिस्ंटस 18,150 वर दिसतो. दुसरीकडे, बँक निफ्टीला 37,700 वर सपोर्ट आहे तर 38,700 वर रझिस्टंस आहे.

हेही वाचा: Share market: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 360 तर निफ्टी 115 अंकांनी घसरला

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

एनटीपीसी लिमिटेड (NTPC)

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

पॉवरग्रीड (POWERGRID)

टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

टाटा पॉवर (TATAPOWER)

ऍस्ट्रल (ASTRAL)

व्होल्टास (VOLTAS)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

भारतफोर्ज (BHARATFORG)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Share Market Update Best Stock To Buy Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..