
Share Market: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1,158 अंकांनी घसरला, निफ्टी 15,808 वर बंद
Share Market Updates: शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरणीचं सत्र सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली घसरणीची मालिका आजही सुरूच राहिली. आज सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले. सेन्सेक्स 1,158.08 अंकांनी अर्थात 2.14 टक्क्यांनी घसरून 52930.31 वर बंद झाला, तर निफ्टी 359.10 अंकांनी अर्थात 2.22 टक्क्यांनी घसरून 15,808.00 वर बंद झाला. निफ्टी-50 मधील WIPRO, EICHERMOT, HCLTECH, TCS, DRREDDY या 5 शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली, तर ADANIPORTS, INDUSINDBK, TATAMOTORS, TATASTEEL, JSWSTEEL सह 45 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.
हेही वाचा: Share Market मध्ये मोठी पडझड; 1700 अशांनी कोसळला Sensex
तत्पूर्वी आज विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात जोरदार घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 480.04 अंकाच्या घसरणीसह 53,608.35 वर सुरु झाला. तर निफ्टी 146 अंकांच्या घसरणीसह 16,021.10 सुरु झाला. सकाळी 10 वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये 934.60 अंकांची अर्थात 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह झाली असून 53,153.79 वर ट्रेड करत आहे तर निफ्टी 276.80 अंकाच्या अर्थात 1.71 घसरणीसह 15,890.25 वर ट्रेड करत आहे.
हेही वाचा: Share Marketने मोडले सगळे रेकॉर्ड्स; Sensex 61,800च्या पार
शेअर बाजार काल सलग चौथ्या सत्रात लाल चिन्हात अर्थात घसरणीसह बंद झाला. इंट्राडेमध्ये निफ्टी 16000 च्या खाली घसरला. शेवटच्या तासात काही प्रमाणात रिकव्हरी पाहायला मिळाली. या रिकव्हरीमध्ये बँक, ऑईल अँड गॅस आणि रियल्टी सेक्टरने चांगले परफॉर्म केले. दिवसाअंती सेन्सेक्स 276.46 अंक अर्थात 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 54,088.39 वर बंद झाला. तर निफ्टी 43.95 अंकांनी 0.27 टक्क्यांच्या घसरणीसह 16,196.10 वर बंद झाला.
Web Title: Share Market Updates Day Closing Status Of Nifty And Sensex
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..