
Share Market: शेअर बाजार दमदार! सेन्सेक्समध्ये 421 तर निफ्टीमध्ये 98 अंकांची उसळी
Share Market Updates Today: आज विकली एक्सपायरीच्या दिवशी दिवशी शेअर बाजाराने सकारात्मक ओपनिंग दिले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आजच्या दिवसाच्या सुरुवातील वधारले. सेन्सेक्स 421.1अंकांनी वधारून 57,458.60वर सुरु झाला तर निफ्टी 98.05 अंकांनी वधारून 17,234.60 सुरु झाला. निफ्टी 50 मधील 44 शेअर्समध्ये दिवसाच्या सुरुवातील घट झाली, तर केवळ 6 शेअर्समध्ये वधारल्याचं पाहायला मिळालं. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला COALINDIA, ADANIPORTS, MARUTI, APOLLOHOSP हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले आहेत. तर NESTLEIND, BAJAJ-AUTO, HINDALCO, BRITANNIA या शेअर्समध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा: Share Market: आज शेअर बाजारात काय असेल स्थिती? या10 शेअर्सवर ठेवा लक्ष
तत्पूर्वी काल बुधवारी भारतीय शेअर बाजाराच्या मागच्या 5 दिवसांच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला. या तेजीत ऑटो, ऑईल अँड गॅस, आयटी, फार्माशिवाय एचडीएफसी आणि रिलायन्सच्या शेअर्सचे मोठे योगदान राहिले. दिवसाअंती सेन्सेक्स 574.35 अंकांच्या अर्थात 1.02 टक्क्यांच्या वाढीसह 57,037.50 वर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टी 177.80 अंकाच्या अर्थात 1.05 टक्क्यांच्या वाढीसह 17,136.50 बंद झाला.
हेही वाचा: Share Market: शेअर बाजार सावरला! सेन्सेक्स 574 तर निफ्टी 177 अंकांनी वधारला
आतापर्यंत सपाटून मार खाल्लेल्या एचडीएफसी आणि आयटी सेक्टरच्या शेअर्समधील रिकव्हरीच्या जोरावर बाजारात तेजी दिसून आल्याचे जियोजित फायनान्शियल्सचे विनोद नायर यांचे म्हणणे आहे. एकीकडे विदेशी गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात विक्री करत असले तरी देशांतर्गत गुंतवणुकदारांकडून सुरु असलेल्या खरेदीमुळे बाजाराने समतोल राखला.
Web Title: Share Market Updates Today Positive Opening Of Sensex And Nifty
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..