
आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?
Share Market | हे शेअर्स देणार भरघोस रिटर्न! जाणून घ्या मार्केट मुड
10 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात शेअर बाजार (Share market)सलग दुसऱ्या आठवड्यात तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. कोविड-19 (Covid-19)च्या नव्या व्हेरिएंटची चिंता आणि कमजोर जागतिक संकेतांचा बाजारावर परिणाम दिसून आला खरा पण नंतरच्या 2 व्यापार सत्रांमध्ये बाजाराने चांगली रिकव्हरी (Recovery)केली. कोरोनाच्या नवीन प्रकाराशी संबंधित भीती थोडी कमी होताना दिसत आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसू लागला आहे. याशिवाय आरबीआयचे चलनविषयक धोरण (Monetary policy)आल्यानंतर बाजाराला अधिक चालना मिळाली. रिझर्व्ह बँकेचे दर न वाढवण्याच्या धोरणामुळे बाजारात तेजी परत आली. शुक्रवारी सेन्सेक्स (Sensex) 1,090.21 अंकांच्या अर्थात 1.88 टक्क्यांच्या वाढीसह 58,786.67 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 314.6 अंकांच्या म्हणजेच 1.82 टक्क्यांच्या वाढीसह 17,511.3 वर बंद झाला.

Sensex share market
गेल्या आठवड्यात बीएसईचा स्मॉलकॅप (Smallcap) निर्देशांक 3 टक्क्यांहून अधिक वाढला. जवळपास 100 शेअर्स असे आहेत. ज्यांनी डबल डिजिट परतावा दिला आहे. यामध्ये नेटवर्क 18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्स, रिलायन्स कम्युनिकेशन्स, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी, 63 मून टेक्नॉलॉजीज, महानगर टेलिफोन निगम आणि रॅमकी इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश आहे. तर Nxtdigital, HCL Infosystems, Panacea Biotec, Prime Focus, AAVAS Financiers, Indraprastha Medical Corporation यांच्या शेअर्समध्ये मोठे नुकसान झाले.
गेल्या आठवड्यात बीएसई मिडकॅप निर्देशांक (BSE Midcap Index)2 टक्क्यांनी वधारला. आयडीबीआय बँक, व्होडाफोन आयडिया, आयडीएफसी फर्स्ट बँक, जिंदाल स्टील अँड पॉवर, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स आणि एबीबी इंडिया या मिडकॅप्सला घवघवीत नफा मिळाला तर JSW एनर्जी, व्हर्लपूल ऑफ इंडिया, ऑइल इंडिया आणि अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेस या मिडकॅप्समा मोठे नुकसान सहन करावे लागले.

Share Market
10 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, बीएसई लार्जकॅप निर्देशांक (BSE Largecap Index)सुमारे 2 टक्क्यांनी वाढला. अदानी टोटल गॅस, सीमेन्स, डीएलएफ, हिंदाल्को इंडस्ट्रीज आणि मदरसन सुमी सिस्टीम या नफ्यात राहिल्या तर एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस, कोल इंडिया, डिव्हिस लॅबोरेटरीज आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनींना नुकसान सोसावे लागले.
गेल्या आठवड्यात, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार मूल्यात (Market Value) बीएसई सेन्सेक्समध्ये सर्वात मोठी वाढ झाली. त्यानंतर आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात तेजी दिसली, दुसरीकडे भारती एअरटेल आणि कोटक महिंद्रा बँकेच्या मार्केट कॅपमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.

Share Market
शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात सर्व क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Index) हिरव्या रंगात अर्थात तेजीसह बंद झाले. निफ्टीचा मीडिया इंडेक्सने 9 टक्क्यांच्या वाढीसह सर्वोत्तम कामगिरी केली. तर निफ्टी पीएसयू बँक 6 टक्के आणि मेटल 5 टक्क्यांनी वधारले.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात 9,203.47 कोटी रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 7,212.34 कोटी रुपयांची खरेदी केली. दुसरीकडे, डिसेंबर महिन्यात आतापर्यंत एफआयआयने 16,235.19 कोटी रुपयांची विक्री केली आहे, तर डीआयआयने 13,700.80 कोटी रुपयांची खरेदी केली आहे.

Share Market
आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?
- एशियन पेन्ट्स (ASIAN PAINTS)
- ग्रासिम (GRASIM)
- एसबीआय लाईफ (SBILIFE)
- भारतीय स्टेट बँक (SBIN)
- बीपीसीएल (BPCL)
- आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBK)
- बँक ऑफ इंडिया (BANKINDIA)
- ग्लेनमार्क (GLENMARK)
- कॅनरा बँक (CANBK)
- कमिंस इंडिया (CUMMINSIND)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.